Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांसाठी दिलासा बातमी: सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ

शेतकऱ्यांसाठी दिलासा बातमी: सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ


धाराशिव: फेडरेशन कडे नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी केवळ 25% शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे उर्वरित 75 टक्के नोंदणी केलेली शेतकऱ्यांची खरेदी 31 जानेवारीपर्यंत करणे अशक्य असल्याने सोयाबीन खरेदीला पुन्हा एकदा मुदत  वाढ देण्यात यावी यासाठी आपण राज्य सरकारकडे आग्रही केला त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सकारात्मक पाठपुराव्यामुळे सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ मिळाली असल्याची माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे

याबाबत माहिती देताना संदर्भात आमदार पाटील यांनी म्हटले की नोंदणी करत शेतकऱ्यांची एकूण संख्या आणि बाजारात भाव मिळत नसल्याने हमीभाव खरेदी केंद्राकडे वाढलेला शेतकऱ्याचा कल पाहता अधिक अधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे .त्यासाठी सोयाबीन खरेदीला पुन्हा एकदा मुदत वाढ मिळावी यासाठी आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे आग्रही पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याला आज यश मिळाले आहे जिल्ह्यात 21 हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत सुरुवातीला  हवामानातील बदलामुळे अपेक्षित दर नसल्याने शेतकरी बांधवांना हमीभाव केंद्रावर सोयाबीन घालण्यासाठी विलंब झाला त्यातच बारदाना अभावी अनेक दिवस खरेदी बंद होती जिल्ह्यात पस्तीस हजार चारशे तीन शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे नोंदणी केलेली आहे त्यापैकी 1829 शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडून मेसेज पाठवण्यात आले आहेत त्यातील 7,639 शेतकऱ्यांच्या 1,97,194 क्विंटल सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अद्याप 70 टक्के पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होणे बाकी असूनही खरेदी प्रक्रिया 31 जानेवारी या मुदतीस पूर्ण होणे शक्य नव्हते त्यामुळे मुदत वाढीसाठी पाठपुरावा सुरू होता त्यानुसार खरेदीला आता 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ मिळाल्यामुळे नोंदणी केलेली शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments