Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतीच्या व कौटुंबिक वादातून वृद्धाचा खून, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा, धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

शेतीच्या व कौटुंबिक वादातून वृद्धाचा खून, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा,  धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल


धाराशिव: कौटुंबिक व शेत जमिनीच्या वादातून वृद्धाचा खून केल्याप्रकरणी भावकीतील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोकण्यात आली तर आरोपी असलेल्या मृताच्या भावाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खती यांनी मंगळवार दिनांक 8 रोजी हा निकाल सुनावला.

याबाबत या घटनेची विधीज्ञ यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील येडशी येथील भास्कर रंगनाथ नाग टिळक वय 60 यांचा येडशी शिवारातील शेतात महेंद्र वामन नागटिळक वय (35) राहणार येडशी यांनी 6 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री तलवारीने वार करून खून केला. कौटुंबिक व शेत जमिनीच्या वादातून त्यांनी भास्कर याची निग्रण हत्या केली. मयताची मुलगी ही कुमाळवाडी येथे दिलेली असून तिची नणंद ही महेंद्र याची पत्नी आहे ती नांदत नसल्याने तिला नांदावयास येण्यास सांग तसेच ती जोपर्यंत नांदावयास येत नाही तोपर्यंत तुझी मुलगी नांदावयास  पाठवू नको असे महेंद्र हा भास्कर यांना सांगत होता.तसेच भास्कर व त्याचा भाऊ सोमनाथ नागटिळक यांच्यात शेत जमिनीचा वाद होता जमीन हडपण्यासाठी त्यांनी महेंद्र या सुपारी देऊन भास्कर याचा काटा काढल्याची फिर्याद मयताची पत्नी अश्विनी भास्कर नागटिळक यांनी 7 नोव्हेंबर 2018 रोजी यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान संहिता कलम 302,506, 341,201,34 व शस्त्र अधिनियम  25(4) धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून महेंद्र नागटिळक व सोमनाथ नागटिळक दोघे राहणार येडशी यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता.

सुनावणीच तपासण्यात आली 16 साक्षीदार

 याप्रकरणी पोलिसांनी तपास करून धाराशिव येथील न्यायालयात दोषारोपत्र  पत्र दाखल केले होते या प्रकरणाच्या सुनावणीत एकूण 16 साक्षीदार तपासण्यात आले याप्रकरणी साक्ष पुराव्यानंतर समोर आलेली बाजू ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी महेंद्र नागटिळक यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर सोमनाथ नागटिळक यांची सबळ पुरावाअभावी निर्दोष मुक्तता केली याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता  Adv. पंडित जाधव यांनी भक्कम व्यक्तिवाद केला.

आरोपीने मयताच्या पत्नीसमोर केले होते 4 तुकडे

या घटनेतील आरोपी यांनी मयत भास्कर नागटिळक याचा खून करून त्यांच्या शरीराचे चार तुकडे केले व नंतर ते येडशी येथील डोंगरात नेऊन टाकले, या घटनेमध्ये तलवारीने खून केल्यानंतर तलवार पाण्याने धुवायला लावले, त्यांनी फिर्यादीच्या गळ्याला तलवार लावून डोंगरात नेले व तेथे एका झाडाला तारेने बांधून ठेवले व फिर्यादीच्या डोळ्यासमोर मयत भास्कर नागटिळक यांच्या शरीराचे चार तुकडे केले होते.



Post a Comment

0 Comments