सोशल मीडियावर फक्त ऑपरेशन सिंदूरच ! कारवाईचे व्यापक स्वागत ,भारतीय लष्कर, सरकारवर कौतुकाचा वर्षाव
धाराशिव: भारताने पाक व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष करत पहेलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला भारताच्या या शौर्याबद्दल अवघ्या भारतीयांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत ऑपरेशन सिंदूर विषयी भारत रहने का हमे गर्व है अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत कारवाईचे स्वागत केले. सोशल मीडियावर बुधवारी दिनांक ७ रोजी केवळ ऑपरेशन शेंदूर ची चर्चा झाली.
दिनांक 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटकावर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला त्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला; या भ्याड हल्ल्याविरुद्ध अवघ्या भारतीयांनी एकजूट दाखवत तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करत दहशतवादी व पाकिस्तानचा बदला घेण्याची भावना व्यक्त केली होती. भारतीय लष्कराने दिनांक ७ मे रोजी मध्यरात्रीनंतर पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणांना लक्ष करत तेथील दहशतवादी तळ उध्वस्त केले पहाटेच्या सुमारास देशवासीयांच्या कानी ही वार्ता पडताच नागरिकांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले. सोशल मीडियातील फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर अशा अनेक मार्गाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत भारतीय लष्करांची व भारत सरकारचे मनोबल वाढवण्यास हातभार लावला यासाठी अनेक नेटकरे यांनी चित्रपटातील डायलॉग फोटो यांचा आधार घेतला तर काहींनी काव्यपंक्ती द्वारे आपले मत व्यक्त केले.
एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो.... या एका चित्रपटातील डायलॉगच्या माध्यमातून पहेलगाम मधील मृत पर्यटकांच्या पत्नीची कुंकू पुसणार याचा हिशोब चुकता केल्याचे सोशल मीडियावर नमूद केली आहे.' कब ॲक्शन लेगा कहकर रो रहे थे जब ॲक्शन लिया तब सो रहे थे असे लिहून विरोधकांची खिली उडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याची छबी असलेली फोटो टाकून अनेक आणि दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर से नमूद करीत भारतीय सैनिकाविषयी आदर व्यक्त केला.
Mockdril बोल की एअरस्टाईल कर दिया
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये सिंघम या चित्रपटातील डायलॉग चा आधार घेत mockdril बोल के एअरस्ट्राइक कर दिया.... चीटिंग करता है ... चीटिंग.... चीटिंग.... करता है तू.... अशी चित्रपटातील दृश्याच्या फोटोसह पोस्ट करीत नेटकरी यांनी एअरस्ट्राइक चे कौतुक केल.
डीपी स्टेटस झाले अपडेट
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवल्याची वार्ता पहाटे नागरिकाच्या कानावर पडली त्यानंतर लगेचच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ऑपरेशन सिंदुर विषयी पोस्ट व्हाट्सअप डीपी स्टेटस वर ठेवले; अनेकांनी भारतीय सैनिकांची छायाचित्र आणि पाकिस्तान मध्ये ज्या ठिकाणी हल्ला केला तेथील व्हिडिओ स्टेटस ठेवत भारतीय सैन्याच्या कारवाईची समर्थन केले.
0 Comments