Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतातील घरात एकटी असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना

शेतातील घरात एकटी असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना


तुळजापूर : तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 32 वर्षीय महिला शेतातील घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन एका तरुणाने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील महिलेवर दि.19.03.2025 रोजी 13.30 वा. सु.ही शेतातील घरी एकटी असताना गावातील एका तरुणाने तेथे येवून बळजबरी तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.07.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पोलीस ठाण्यामध्ये भा.न्या.सं.कलम-64, 351(2), 351(3), सह अ.जा.ज.अ.प्र. का. कलम 3 (2) (व्हिए) कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मागील दोन महिन्यापासून तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी घटनाचे प्रमाण वाढत चालले असून या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे असे नागरिकांतून बोलले जात आहे

Post a Comment

0 Comments