तुळजापूर : कामगार विरोधी कायदा रद्द करण्यासाठी तुळजापूर येथे इंटक मजदूर काँग्रेसचे आंदोलन
तुळजापूर : राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी.संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात देशात आंदोलन उभारले असून राज्यात महाराष्ट्र इंटक चे प्रदेशाध्यक्ष डॉ.कैलास भाऊ कदम,श्री गोविंदराव मोहिते, जनरल सेक्युरिटी, महाराष्ट्र राज्य, इंटक, श्री दिवाकर दळवी खजिनदार, महाराष्ट्र राज्य, इंटक, श्री मुकेश तिगोटे सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य, इंटक, यांच्या मार्गदर्शनात इंटक धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री मधुकर शेळके यांनी कामगार विरोधी व कॉर्पोरेट धार्जिण्या 4 श्रम संहिता अंमलबजावणी रद्द करा! केंद्र व राज्याच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी देश विरोधी धोरणे व त्याला अनुषंगून केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने मंजूर केलेल्या चार श्रम संहितांना तीव्र निषेध ९ जुलै२०२५ देशव्यापी संप निमित्त आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने एप्रिल २०२५ पासून कामगार विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे ४ श्रम संहिताची अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय श्रम मंत्र्यांनी राज्याच्या श्रम खात्याचे सचिव व अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या श्रमसंहिता राबविण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. कामगाराचे कामाचे तास, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, संघटित होण्याचा अधिकार, युनियनला मान्यता मिळून घेण्याचा अधिकार, असमूहिक वाटाघाटीच्या माध्यमातून मागण्या करून घेण्यासाठी संप व लढाई करण्याचा मूलभूत अधिकारावर या श्रमसंहितामुळे गदा येणार आहे.श्रमसंहिता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कार्पोरेट मालकाचे भले करण्यासाठी कामगारावर लादण्यात येणारी गुलामी आहे.
यासाठी महाराष्ट्र इंटक सलग्न सर्व श्रमिक संघटनांना.नम्र विनंती आहे की केंद्र सरकार व राज्य सरकार. देशातील व राज्यातील कष्टकरी कामगारांच्या हिताविरुद्ध कायदे कानून बनवून हक्क हिसकवून घेत आहे.यामुळे आपल्याला भविष्याच्या पिढीला गुलाम बनवण्याची षडयंत्र आहे.नुकतेच महाराष्ट्र जनंसुरक्षा विधेयक प्रस्तावित आहे.ते मंजूर होऊ नये करिता आपण सर्वांनी आपल्या परिसरातील आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांना भेटून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यास जागृत करावेत.दिनांक ९ जुलै२०२५ रोजी होऊ घातलेला देशव्यापी संप निमित्त तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा दादा पाटील यांनी विधानसभेमध्ये कामगाराचा विषय घेण्यात यावा या मागणीचे निवेदन संपर्क कार्यालयात देण्यात आले.
तरी धाराशिव जिल्ह्यातील सर्व श्रमिक संघटनांना व संघटित कामगार व असंघटित कामगार यांनी आंदोलन तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर त्यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी माहितीस्तव माननीय तहसीलदार साहेब यांना प्रति. पोलीस निरीक्षक मांजरे साहेब यांना प्रती पोलीस कॉन्स्टेबल शिरसागर साहेब यांचे सहकार्य तसेच यावेळी इंटक जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके,जिल्हा सचिव किरण यादव,इंटक जिल्हा उपाध्यक्ष विकास हावळे,इंटक युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगळे ,तालुका सचिव सुहास कानडे, निरंजन व्हरकट. विकास भागवत घोडके. रोहित शेंडगे. अजय शांताराम पवार ,किशोर दरेकर,दत्ता कांबळे, दयानंद शिरसागर, गणेश पोटे, ्निलेश नानासाहेब एडके,समाधान सोनवणे, गोरखनाथ सोनवणे ्आदी मजदूर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments