भूम पोलीस ठाण्यात तरुणाचा थरार! तलवारीने पोलिसांवर खुनी हल्ला एक जखमी, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल- Bhum Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

भूम पोलीस ठाण्यात तरुणाचा थरार! तलवारीने पोलिसांवर खुनी हल्ला एक जखमी, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल- Bhum Police Station Crime News

भूम पोलीस ठाण्यात तरुणाचा थरार! तलवारीने पोलिसांवर खुनी हल्ला एक जखमी, शासकीय मालमत्तेचे नुकसान, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल- 


धाराशिव/प्रतिनिधी रुपेश डोलारे  : भूम शहरातील एका युवकांनी ५ जुलै च्या मध्यरात्री भूम पोलीस ठाण्यात जाऊन दहशत माजवत चक्क कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वर्दीचा धाक संपुष्टात आला की काय? चक्क पोलीसच असुरक्षित आहेत तर सर्वसामान्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ठाण्यामध्ये गणेश दत्तू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ५ ऑगस्ट रोजी मध्ये रात्री १ वाजून ५० मिनिटांनी शुभम भोसले (राहणार भूम ) या युवकांनी ठाण्यात येऊन दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हातात लोखंडी तलवार घेऊन पोलीस ठाण्यात आला ठाण्यात येताच "पोलीस हरामखोरा आहेत" अशा शब्दात शिवीगाळ करत फिर्यादीस जीवे मारण्याचे उद्देशाने त्यांनी हातातील तलवारीने फिर्यादीच्या अंगावर वार केला परंतु तो फिर्यादीने हुकवला ;यावेळी भोसले यांच्यासोबत असलेल्या दत्ता शिंदे यांनी त्यास अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याला तलवारीचा वार लागला दरम्यान शुभम भोसले यांनी यानंतर पोलीस निरीक्षक श्री गणेश कानगुडे यांच्या केबीनमध्ये जाऊन टेबलवरील काचेवर तलवार मारली असता टेबलावर असलेल्या काचा फुटल्या यात १० हजार रुपयाची शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे; यावेळी ठाण्यात पोलीस हवालदार अजित कवडे हे आले असता यांच्यावरही तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनीही चुकवला व शेजारी असलेले पोलीस हवालदार शिंदे यांना ढकलून दिले याप्रकरणी आरोपी भोसले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109 132 118 ((2) 324 (4),125 ,352 ,351 (3) सह कलम 4 25 भारतीय हत्यार कायदा व मपोका कलम 135 सह फौजदारी दुरुस्ती कायदा कलम 7 अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इ.आर. बंदखडके करत आहेत.चक्क एका युवकाने पोलीस ठाण्यात येऊन मारहाण झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे यामुळे वर्दीचा धाक आहे की नाही? असा सवाल जनमानसातून  उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

0 Comments