मौजे उमरगा चि.येथील इयत्ता तिसरी तील हरिओम जाधव बीट स्तरीय स्पेलिंग स्पर्धेत मिळवला पहिला क्रमांक.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
शाळेच्या वतीने हरिओमचा करण्यात आला सन्मान.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे उमरगा चि.येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी कुमार हरिओम एकनाथ जाधव यांनी बीटस्तरीय स्पेलिंग 'बी 'स्पर्धेमध्ये मंगरूळ बीट मधील सर्व शाळांमधून इयत्ता तिसरीच्या वर्गातून हरिओम एकनाथ जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.धाराशिव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या संकल्पनेतून इंग्रजी भाषा विषय ज्ञान वाढीसाठी संपूर्ण जिल्ह्यात स्पेलिंग उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमाअंतर्गत दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी मंगरुळ येथे घेण्यात आलेल्या बीट स्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत हरिओम जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.कुमार हरिओम जाधव यांनी स्पेलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.कुमार हरिओम जाधव यास शाळेच्या मुख्याध्यापक शिलन कांबळे सर, एकनाथ कोरे सर, कुलकर्णी मॅडम, विशाल सावंत, सोनाली सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.आठ वर्षीय हरिओम एकनाथ जाधव हा श्री.भावार्थ रामायण ग्रंथ अगदी अचुक व सुंदर वाचन ही करतो. हरिओम यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल गाव परिसरातून कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे.
0 Comments