धाराशिव : अंगणवाडी इमारत पाडणे पडले महागात, तत्कालीन महिला सरपंचासह ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : कळंब तालुक्यातील येरमाळा येथील अंगणवाडीची इमारत कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता पाडणे तत्कालीन महिला सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या दोघांनी शासकीय मालमत्तेत नुकसान केल्याची तक्रार विस्तार अधिकाऱ्यांनी कळंब पोलीस ठाण्यामध्ये दिल्याने गुरुवारी उशिरा दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
या घटनेबाबत परिसरा पण मिळाली अधिक माहिती अशी की कळंब तालुक्यातील येरमाळा येथे मागच्या पंचवार्षिक मध्ये मंदाकिनी आबासाहेब बारकुल सरपंच म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या कार्यकाळात गावातील गट क्रमांक 377/ 254 मध्ये शासनाकडून बांधकाम करण्यात आलेली खोली. अंगणवाडी म्हणून वापरत होती ही अंगणवाडी 9 ऑक्टोबर 2023 रोजी कोणतीही प्रक्रिया न राबवता पाडण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तत्कालीन सरपंच मंदाकिनी बारकुल ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र एकनाथ हांडे यांनी शासनाची कोणतीही परवानगी घेतली नाही शिवाय इमारत निर्लेखनाची प्रक्रिया पूर्ण केली नव्हती तरी परवानगीशिवाय त्यांनीही इमारत पाडून टाकली परिणामी शासनाचे एक लाख 50 हजार रुपयाची नुकसान झाल्याची तक्रारीत म्हटले आहे. कळंब पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रय त्रिंबक साळुंखे यांनी गुरुवारी कळंब पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दिली असून त्यानुसार पोलिसांनी-भा.न्या.सं. कलम 324(3), 324(5),भूमी महसूल कायदा व सार्वजनिक संपत्ती आणि प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 Comments