साई भक्ताचे मौल्यवान दान साई चरणी दीड कोटीचे सुवर्ण ॐ साई राम अक्षरे साईचरणी अर्पण-
शिर्डी : एका श्रद्धावान साई भक्तांनी तब्बल 1600 ग्रॅम पेक्षा अधिक वजनाची आणि किंमत एक कोटी 58 लाख 50 हजार 989 इतकी मौल्यवान असलेली दोन सुवर्ण ओम साई राम अक्षरे श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केली आहेत. संबंधित भक्ताच्या इच्छेनुसार त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे ही सुवर्ण अक्षरी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे भक्ती बाबांनी सुपूर्त करण्यात आली त्यानंतर ही अक्षरी श्री साई समाधी मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली असून ती सर्व भाविकांची लक्ष वेधून घेत आहेत. या अमूल्य दाना बद्दल संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी संबंधित साई भक्ताचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली सुवर्णात साकारलेले ओम साईराम हे नक्षीकामाने अलंकृत असून श्रद्धा भक्ती आणि दान क्षितिचा अद्वितीय संगम ठरले आहे.
साई बाबांना सुवर्णदान देणारे हे दुबईतील भाविक दर महिन्याला शिर्डीत येऊन समाधीचे दर्शन घेतात. तसेच आरतीला उपस्थित राहतात. साई दर्शनानंतर ते संस्थानला न चुकता साधारण १ लाख रुपयांची देणगी अर्पण करतात. साई बाबांना सोन्याचे काहीतरी दान करावे, अशी त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. अखेर गुरुवारच्या पवित्र दिवशी त्यांनी दोन सुवर्ण ॐ साई राम अक्षरे अर्पण करून ती इच्छा पूर्ण केली.दुबईतील या भाविकाने दिलेले सुवर्णदान साईबाबा संस्थानच्या वतीने समाधी मंदिरातून भाविक दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या दोन्ही द्वारांवर बसवलेले आहे. त्यामुळे मंदिरातून बाहेर पडताना भाविकांच्या मुखातून ‘ॐ साईराम’ असा जयघोष घुमतो.या दानाविषयी माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले, ‘या भाविकाची इच्छा होती की, त्यांचे दान गुप्त राहावे. त्यामुळे त्यांचे नाव जाहीर केलेले नाही. यावेळी संस्थानच्या वतीने या भाविकाचा शाल, साईमूर्ती आणि उदी देऊन सन्मान करण्यात आला’.
देश विदेशातून लाखो भाविक शिर्डीत दर्शनासाठी दाखल होतात
श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साई बाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दरवर्षी कोट्यवधी भाविक शिर्डीत येतात. यावेळी भाविक साई बाबांना भरभरून दान अर्पण करतात. २००८ साली आदीनारायण रेड्डी यांनी सुमारे १०० किलो सोन्याचे सिंहासन साईबाबा संस्थानला दान दिले होते. यानंतर अनेक भाविक आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर साई चरणी सोन्या-चांदीच्या वस्तू तसेच रोख स्वरुपातही दान करतात. मात्र आजचे हे सुवर्णदान २००८ नंतरचे सर्वात मोठे दान ठरले आहे,’ अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. मागील काही वर्षांत गोरक्ष गाडीलकर यांनी देश-विदेशातील भाविकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विदेशी भाविक मंदिरात किंवा परिसरात भेटले तर ते स्वतः त्यांच्याशी संवाद साधतात. शाल, साईमूर्ती आणि उदी देऊन त्यांचा सत्कार करतात. त्यामुळे भाविकांना मिळणारा हा सन्मान त्यांच्या श्रद्धेत आणि सेवाभावात भर घालणारा ठरत आहे. परिणामी साईबाबांच्या दानपेटीत विदेशी देणग्यांचीही मोठ्या प्रमाणात भर पडताना दिसत आहे.


0 Comments