अॅड.शीतल चव्हाण व त्यांची कन्या स्वरा चव्हाण यांच्या माध्यमातून उमरग्याचे नाव जागतिक पटलावर
भारतातील धार्मिक व सांस्कृतिक वैविध्य दाखवणाऱ्या लोककलांचे नृत्याद्वारे होणार थायलंड मध्ये सादरीकरण
धाराशिव प्रतिनिधी : अॅड. शीतल चव्हाण व त्यांची कन्या स्वरा चव्हाण हे दोघेही UNESCO व अखिल भारतीय सांस्कृतिक संघ (ABSS) यांच्या संयुक्त विद्यमाने पटाया (थायलंड) येथे दि. 25/10/2025 ते दि. 28/10/2025 या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या Cultural Olympiad of Performing Arts (COPA)-2025 मध्ये नृत्य सादरीकरण करणार आहेत.
अॅड. शीतल चव्हाण हे शिवतांडव हा भारतातील धार्मिक, सांस्कृतिक वेगळेपण दर्शवणारा नृत्यप्रकार (Solo) सादर करणार आहेत तर त्यांची कन्या स्वरा चव्हाण ही नरसिंहा चित्रपटातील विष्णू भक्तीच्या गाण्यांवर समूह नृत्य सादरीकरण करणार आहे. त्यात ती भक्त प्रल्हादाच्या भूमिकेत असणार आहे.
अॅड. शीतल चव्हाण यांनी वाचन संस्कृती संदर्भातील अनोखे उपक्रम, सामाजिक कार्य, अभ्यासू लेखन या माध्यमातून उमरगा भागाचे नावलौकिक राज्यात व देशात केलेच होते पण आता लोककलेच्या माध्यमातून ते उमरगायचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत आहेत. त्यामूळे त्यांच्यावर नातेवाईक, मित्रमंडळी व समाजातील सर्व थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

0 Comments