चौदा वर्षापासून प्रतिक्षेत शेतजमीन वाटणीचा वाद अखेर सैनिक फेडरेशन संघटना धाराशिव यांच्या मध्यस्थीने मिटला

Hot Posts

6/recent/ticker-posts

चौदा वर्षापासून प्रतिक्षेत शेतजमीन वाटणीचा वाद अखेर सैनिक फेडरेशन संघटना धाराशिव यांच्या मध्यस्थीने मिटला

चौदा वर्षापासून प्रतिक्षेत  शेतजमीन वाटणीचा  वाद अखेर सैनिक फेडरेशन संघटना धाराशिव यांच्या मध्यस्थीने मिटला


धाराशिव/ प्रतिनिधी राजगुरू साखरे - वडिलोपार्जित जमिनीचे वाटणी करण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील येवती येथील जवान  अमीर पठाण यांना 14 वर्षे संघर्ष करावा लागला अखेर हा वाद सैनिक फेडरेशन संघटना धाराशिव जिल्हा यांच्या मदतीने मिटवण्यात आला.

तुळजापूर तालुक्यातील येवती येथील जवान अमीर पठाण यांचे वडील काशीम पठाण व हैदर पठाण हे दोघे भाऊ यांच्यामध्ये वडिलोपार्जित जमीन होती यामध्ये हैदर पठाण यांच्या नावावर जास्त जमीन  होती तर काशीम पठाण यांच्या नावावर कमी जमीन होती त्यामुळे यांचा वाद पोलीस स्टेशन कोर्ट यावर जाऊन पोहचला होता. यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जमीन वाटपाचा वाद उदभवला... दोन  भाऊ एकमेकांचे वैरी झाले.. जमिनीसाठी वाद सुरू झाला... हा वाद पोलीस स्टेशन,  कोर्टात गेला कोर्टाच्या वाऱ्या सुरू झाल्या... वाद-प्रतिवाद झडले आणि 14 वर्षांच्या या तंट्यावर सैनिक फेडरेशन संघटना यांच्या मदतीने एका झटक्यात तडजोड झाली ! 

या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी की, तुळजापूर तालुक्यातील येवती येथील जवान अमीर पठाण भारतीय सैन्य दलामध्ये देश सेवा करत आहेत. त्यांच्या वडिलोपार्जित असणाऱ्या जमिनीचा चुलते हैदर पठाण व अमीर पठाण यांचे वडील काशीद पठाण यांच्यामध्ये समान वाटणीवरून वाद होता. हा वाद पोलीस स्टेशन ते कोर्टकचेरी पर्यंत जाऊन पोहोचला होता मात्र त्यामध्ये तडजोड झाली नव्हती. दरम्यान अमीर पठाण चे वडील काशीम पठाण यांनी सैनिक फेडरेशन धाराशिव यांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणाची सर्व हकीगत सांगितली यानंतर पदाधिकारी यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन जवान पठाण यांच्या येवती गावामध्ये जाऊन पंचायतीमध्ये हा प्रश्न मांडून समोरल्या पार्टीवरही अन्याय होऊ नये अशा रीतीने दोघा भावांमध्ये असलेले कमी जास्त जमीन दोघांना कायदेशीर भाषेत समजावून सांगून वाद मिटवला.याप्रकरणी सैनिक फेडरेशन धाराशिव व तुळजापूरचे पदाधिकारी सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक जावळे साहेब व कार्यकारी अध्यक्ष ,सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष, व जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच नॅशनल लीगल सर्विस ऑथोरिटी जिल्हा सूत्र न्यायालय सदस्य, धाराशिव(नालसा)  धाराशिव माजी सैनिक गाडेकर साहेब , सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका अध्यक्ष, माजी सैनिक श्री मुजावर साहेब, व सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका उपध्यक्ष माजी सैनिक श्री संभाजी बळीराम काळजते साहेब यांच्या मदतीने हा वाद मिटवण्यात आला. या कामी संरपच अमोल गवळी  , उपसंरपच,  तटांमुकती अध्यक्ष, पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचे सहकार्य लाभले. 


Post a Comment

0 Comments