नगराध्यक्षपदासाठी आज आरक्षण सोडत; इच्छुकांचे लक्ष-Naradhyaksha Reservation Election News

Hot Posts

6/recent/ticker-posts

नगराध्यक्षपदासाठी आज आरक्षण सोडत; इच्छुकांचे लक्ष-Naradhyaksha Reservation Election News

नगराध्यक्षपदासाठी आज आरक्षण सोडत; इच्छुकांचे लक्ष-

मुंबई/प्रतिनिधी रूपेश डोलारे : राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आज 6 ऑक्टोबर रोजी मंत्रालयात सोडत केली जाणार आहे. त्याचबरोबर 8 ऑक्टोबर रोजी प्रभागातील नगरसेवक पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे या सोडतिकडे नागरिक ,राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवारांचे डोळे लागलेले असून राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे गेल्या अनेक दिवसापासून नगराध्यक्ष पदाची संधी कोणाला असणार अशा चर्चा शहरा- शहरात होत आहेत. मात्र आरक्षणाचे स्वरूप निश्चित न झाल्याने अनेक जण संभ्रमात होते समोरच्या सोडती नंतर हे पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण असणार हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान अनेक जण नगराध्यक्ष पदाचे आरक्षणासाठी देव पाण्यात ठेवून प्रार्थना करत असल्याचे समजते नगराध्यक्ष पद कोणासाठी राखीव होणार यावर आगामी निवडणुकीची दिशा ठरणार असून संपूर्ण शहराचे लक्ष आता या सोडतीकडे लागलेली आहे नगराध्यक्ष पदाचे आरक्षणाच्या या सोडतीतून केवळ उमेदवारच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शहराचे लक्ष आता या सोडतीकडे लागलेली आह नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाच्या या सोडतीतून केवळ उमेदवारीच नव्हे तर संपूर्ण शहराच्या राजकारणातील महत्त्वाचे पाऊल पडणार आहे नागरिकांमध्ये या सोडती बद्दल प्रचंड उत्सुकता आहे आता कोण नगराध्यक्ष होणार ? कोणत्या गटातून कोणता उमेदवार असणार? कोणत्या इच्छुकाचे स्वप्न भंगणार अशा चर्चांना सोमवार नंतर उधान येणार आहे.

या आरक्षण सोडतीच्या संदर्भात नगर विकास विभागाने शुक्रवारी राजकीय पक्षाचे अध्यक्ष यांना पत्र पाठवले आहे सोडतीसाठी पक्षाच्या दोन्ही प्रतिज्ञा निमंत्रित करण्यात आली आहे.

प्रभागाचे आरक्षण 8 ऑक्टोबर पर्यंत ठरणार

नगरपालिका नगरपंचायत यामधील विविध प्रभागांमधील आरक्षण 8 ऑक्टोबर पर्यंत निश्चित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे तशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने करण्यात आली आहे असे सूत्रांनी सांगितले.

9 ऑक्टोंबर रोजी सर्व जिल्ह्यांमधील आरक्षण स्थिती जाहीर केली जाईल त्यानंतर 14 ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात येतील 28 ऑक्टोबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर होईल.

 लेखन संपादक: राजगुरु साखरे (बालाघाट न्युज टाइम्स)

Post a Comment

0 Comments