धाराशिव: शेत जमिनीच्या वादातून पिता पुत्रा डोळ्यात चटणी टाकून बेदम मारहाण-
धाराशिव : शेतजमिनीच्या वादातून परंडा तालुक्यातील टाकळी येथे गैर कायद्याची मंडळी जमून पिता-पुत्रास शिवीगाळ करत डोळ्यात चटणी टाकत लाथा बुक्क्यांनी बांबूने आणि लाईटच्या केबलने मारहाण केल्याची घटना दिनांक 23 रोजी घडली आहे याप्रकरणी ज्ञानेश्वर रामभाऊ भोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की परंडा तालुक्यातील टाकळी येथे शेत जमिनीच्या वादाच्या कारणावरून दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास टाकळी येथील शेत गट क्रमांक 117 मध्ये फिर्यादी ज्ञानेश्वर भोरे व त्यांचे वडील यांना आरोपी ईश्वर भाऊराव भोरे, गणपती भाऊराव भोरे, ब्रह्मदेव भोरे, ऋषिकेश भोरे, माऊली भोरे, आणि कृष्णा भोरे सर्व राहणार टाकळी यांनी शेत जमिनीच्या वादाच्या कारणावरून एकत्र होऊन फिर्यादी व त्याच्या वडिलांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी बांबू लाईटचे केबल व चटणी टाकून मारहाण केली या प्रकरणी ज्ञानेश्वर मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिसांनी वरील सहा आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 189 (2) 191 (2) 191 (3) 190 352 351 (2) 118 (1)अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments