माळशिरस : पै. दत्ता मगर यांच्याकडून महसूल सहाय्यक कुमारी सोनिया कागदी यांचा सन्मान-Malshris Local News Daily

Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस : पै. दत्ता मगर यांच्याकडून महसूल सहाय्यक कुमारी सोनिया कागदी यांचा सन्मान-Malshris Local News Daily

माळशिरस : पै. दत्ता मगर यांच्याकडून महसूल सहाय्यक कुमारी सोनिया कागदी यांचा सन्मान.


अकलूज प्रतिनिधी संजय निंबाळकर : माळशिरस तालुक्यातील दसुर गावच्या एका गरीब कुटुंबातील मुलगी कु. सोनिया शरद कागदे यांनी शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर यश मिळवत नुकतीच महसूल सहायक या पदावर नाशिक येथे त्यांची प्रशासनामार्फत नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यांच्या याच यशाबद्दल दसुर गावातून व तसेच संपूर्ण तालुक्यातून सोनियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी सत्कार करण्यासाठी बळीराजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भावी जिल्हा परिषद सदस्य दत्ता भैया मगर मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

यावेळी कागदे कुटुंबाच्या सत्कारासाठी माढा विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार अभिजीत आबा पाटील तसेच त्यांच्याबरोबर उमेश मालक परिचारक, जानकर, दत्ता भैया मगर, अभिराज पूर्वत, युवराज अंधारे याप्रसंगी माढा तालुक्यातील आमदारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन सांगितले की, या यशाप्रमाणेच गावातील तालुक्यातील, जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील समाजातील मुलींनी.... या यशाचा आदर्श घेऊन उच्चशिक्षणाच्या जोरावर आपल्या आई-वडिलांचा, समाजाचा व गावाचा मानसन्मान वाढवावा.... असे आवाहन सर्वच मान्यवरांनी केले.या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments