सरकारची लाडक्या बहिणींना भाऊबीज; सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी आजपासून खात्यात होणार जमा-
मुंबई/ प्रतिनिधी रुपेश डोलारे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना शुक्रवारपासून सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे दिवाळी आधीच लाडक्या बहिणींना राज्य सरकारची भाऊबीज भेट मिळणार आहे यामुळे लाडक्या बहिणी मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑक्टोंबर उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचे हप्त्याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती. राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मात्र सामाजिक न्याय विभागाने बुधवारी शासन निर्णय प्रसिद्ध करत महिला व बालविकास विभागाला 410 कोटी तीस 30 लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे.
सरकारने आव्हान केल्यानुसार अनेक लाडक्या बहिणींची केवायसी बाकी आहे यामुळे याच महिलांना रक्कम मिळणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता परंतु ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत असल्याने सर्व पात्र महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार असल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

0 Comments