मुरूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंटणखाणयावर छापा, तीन पीडित महिलांची सुटका तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल-
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे : मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव(Tugaov) फाट्याजवळील धाब्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) धडक कारवाई केली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत देहविक्री करणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते, तर अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन आरपी विरुद्ध मुरूम पोलीस ठाण्यामध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मुरूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव पाटीजवळ शेतात कुंटणखाना चालवून तीन महिलांना आश्रय देऊन त्यांच्यामार्फत अनैतिक देह वापर करून घेणाऱ्या तिघाविरुद्ध मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक २७ रोजी सायंकाळी 7:42 वाजेच्या सुमारास उमरगा तालुक्यातील येणगुर शिवारातील आरोपी लक्ष्मण किरण बिराजदार यांच्या शेतात करण्यात आली. आरोपी लक्ष्मण किरण बिराजदार,संजय शिवाजी बनसोडे (राहणार जेकेकुरवाडी ता. उमरगा व मलंग उस्मान भोजगेवार शेख रा.येणेगुर तालुका उमरगा हे तिघे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी लक्ष्मण बिराजदार यांच्या येणेगुर शिवारातील शेतात ३ महिलांना अनैतिक देह व्यापारात परावर्त करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून उपजीविका करत होते. याबाबत मुरूम पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दिनांक 27 रोजी सायंकाळी याबाबत खात्री करून सदरील ठिकाणी छापा टाकून कारवाई करत तीन महिलांची सुटका केली या प्रकरणी वरील तीन आरपी विरुद्ध मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास मुरुम पोलीस करत आहेत.

0 Comments