बनावट आधार कार्ड बनवून अल्पवयीन मुली सोबत बालविवाह करून लैंगिक अत्याचार ; तरुणावर गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध निर्माण करून तिचे बनवत आधार कार्ड तयार करून तिला व तिच्या आईला तिचे लग्न लावण्यास भाग पाडून तिच्यासोबत बालविवाह करून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे .याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचार कायद्यान्वये तसेच बालविवाह अधिनियम सह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 16 वर्षीय9 महिने मुलगी दि.21.01.2025ते 23.12.2025 रोजी हिस गावातील एका तरुणाने प्रेम संबंध निर्माण करुन तिचे बनावट आधारकार्ड बनवून ती 19 वर्षाची असल्याचे दाखवुन तिला व तिचे आईला तिचे लग्न लावण्यास भाग पाडुन तिच्या सोबत बालविवाह करुन तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेची आई यांनी दि.28.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(2)(एफ),64(2)(एम), 340(2),336,(3) सह कलम 7,10 बालविवाह अधिनियम सह पोक्सो कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.

0 Comments