ब्रेकिंग : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अवैध गावठी कट्टा जप्त."स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव ची कारवाई-Breking News Dharashiv Lcb News

Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रेकिंग : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अवैध गावठी कट्टा जप्त."स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव ची कारवाई-Breking News Dharashiv Lcb News

ब्रेकिंग : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अवैध गावठी कट्टा जप्त."स्थानिक गुन्हे शाखा  धाराशिव ची कारवाई-


धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे:  मा. पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस नववर्षाच्या पुर्वसंध्ये निमीत्त अवैध धंदे करणारे, तसेच अवैध शस्त्र बाळगणारे इसम यांचे विरुध्द कारवाई करण्याचे आदेशीत केले होते.स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक गस्त करीत तुळजापूर येथे आल्यानंतर त्यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की धाराशिव जिल्हा अभिलेखा वरील पाहिजे आरोपी नामे गणेश उर्फ गणेशा जंपाण्या भोसले, रा कारला, तालुका तुळजापूर, हा त्याचा राहत्या घरी असून त्याच्याकडे गावठी कट्टा असून तो कोठेतरी चोरी करण्याकरिता जाणार आहे. 

अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पथकाने दि.30.12.2025 रोजी 11.45 वा. सदर ठिकाणी गेले असता मिळालेल्या बातमी प्रमाणे नमूद आरोपी त्याच्या घराच्या पाठीमागे चिंचेच्या झाडाखाली बसलेला दिसून आला. पोलीस पथकाला पाहून  त्याने गावठी कट्टा तेथेच फेकून त्या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी पंचनामा करून नमूद गावठी कट्टा जप्त करून सदर आरोपीच्या विरोधात पोस्टे नळदुर्ग गुर नंबर 489 /25 कलम 3, 25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास चालू आहे. जप्त करण्यात आलेला गावठी कट्टा पुढील कारवाई कामी पोस्टे नळदुर्ग यांच्या ताब्यात देण्यात आला आहे

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री  विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सुदर्शन कासार,पोह/576 शौकत पठाण, पोह/289 जावेद काझी, पोह/929 प्रकाश औताडे, पोह/1275 फरहान पठाण,मपोह/1327 शोभा बांगर, चापोह/539 रत्नदीप डोंगरे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments