हैदराबाद सोलापूर महामार्गावर ईटकळ जवळ पिकअप -दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार नळदुर्ग पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल-
तुळजापूर : हैदराबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील ईटकळ जवळ दिनांक 1 रोजी मोटरसायकलवर व पिकप यांच्यात भीषण अपघात घडला यात मोटरसायकल स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशन (Naldurg police Station)मध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या घटनेबाबत पोलिसांनी मिळालेली अधिक माहिती अशी की ,मयत नामे-सादीक महेबुब शेख, वय 31 वर्षे, रा. रहिमनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.01.12.2025 रोजी 18.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 ए.झेड 6205 वरुन जात होते. दरम्यान हैद्राबाद ते सोलापूर रोडवर (Solapur -Hyderabad Road) हॉटेल स्वागत जे जवळ इटकळ शिवारा अशोक लिलॅन्ड पिकअप क्र एमएच 14 डी एम 8903 चा चालक(Accuse Driver) आरोपी नामे- शाहरुख इब्राहीम तालीकोटे, रा. काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यानी त्याचे ताब्यातील पिकअप हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून सादीक शेख यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात सादीक शेख हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अश मजकुराच्या फिर्यादी नामे- आयशा सादीक शेख, वय 24 वर्षे, रा. रहिमनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.04.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम(BNS) 281, 106(1) सह 184, 134 (अ)(ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

0 Comments