लातुर :पूर्ववैमनस्यातुन तरुणाची निग्रण हत्या ;सहा आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या -Latur Crime News Ahamadpur police station

Hot Posts

6/recent/ticker-posts

लातुर :पूर्ववैमनस्यातुन तरुणाची निग्रण हत्या ;सहा आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या -Latur Crime News Ahamadpur police station

लातुर :पूर्ववैमनस्यातुन २६ वर्षीय  तरुणाची निग्रण हत्या ;सहा आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या -


लातूर : अहमदपूर शहरात पूर्व वैमान्यातून 26 वर्षीय तरुणाची चाकू व काठीने वार करून निर्गुण  हत्या केल्याची खळबळ घटना रविवार दिनांक 21 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेतील मृत तरुणाचे नाव मयत शोयब इसाक बागवान वय 26 (रा. बागवान गल्ली अहमदपूर) अशी आहे याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात ६ जनाविरुद्ध भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम 2023 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार  फरार आरोपीस   पोलिसाची विशेष पथके रवाना करून पकडण्यात आले.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत शोएब इसाक बागवान वय 26 ((रा. बागवान गल्ली अहमदपूर )आणि फिर्यादी उमेर खाजामौदीन बागवान हे अबूबकर किराणा दुकानाच्या बाजूला बोलत होते रस्ताना मागील भांडणाचा राग मनात धरून सहा आरोपींनी संगनमतानी त्याच्यावर हल्ला केला. आरोपीने जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकू व काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शोएब  बागवान गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला .उमेर बागवान जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत .

या प्रकरणी सिकंदर खलील शेख, समीर खलील शेख, आमिर खलील शेख ,कलीम खलील शेख, आणि मालन बबलू शेख (सर्व राहणार अहमदपूर )यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे .या सहा आरोपीपैकी  दोघे जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत तर उर्वरित चार आरोपी फरार झाले होते, मात्र या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना काही तासांमध्ये यश आले असून नमूद सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.  याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 830 / 2025 अन्वे BNS  2023 मधील कलम 103 118 (2) 189 (2) 191 (2) (3) 190 351 (2) 352  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

या घटनेचे गांभीरे लक्षात घेऊन लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी अहमदपूर पोलीस ठाण्याला भेट देत घटनास्थळी पाहणी केली .शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोखू बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास उपभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments