तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील पाटील विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा(गेट टुगेदर) उत्साहात संपन्न -
शेतकरी पुञ दादाराव शिंदे यांच्या बैलगाडीतून शाळेमध्ये रॉयल एन्ट्रीने वेधले सर्वांचे लक्ष
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू अण्णा पाटील माध्यमिक विद्यालयातील २००० सालच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २५ वर्षानंतर गुरुवारी दि,२५ रोजी स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये माजी विद्यार्थी दादाराव शिंदे यांनी अस्सल पारंपरिक वेशभूषेत सजवलेल्या बैलगाडी घेऊन शाळेमध्ये रॉयल एन्ट्री केली यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.या हटक्या गेट-टुगेदर सोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
या कार्यक्रमांमध्ये प्रारंभी सकाळी 10:30 वाजता शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. राष्ट्रगीत आणि प्रार्थना यांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .मागील काही काळात मृत्यू झालेल्या शिक्षक व वर्ग मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला.आपले वय, पद, प्रतिष्ठा कामाचा व्याप बाजूला ठेवून सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी अगदी उत्साहाने एकत्र जमले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षानंतर आपण एकत्र भेटत आहोत त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावना होतीच पण सर्वजण एकत्र आले. सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेतली. उपस्थित सर्व शिक्षकांचा हार पुष्पगुच्छ फेटा बांधव सन्मान करण्यात आला आले. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांचा आठवण म्हणून गुरुवर्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यानंतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बनसोडे यांनी केले तर सहशिक्षक शहाजी मस्के यांनी आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वितेसाठी माजी विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एल के. बिराजदार,सहशिक्षक शिंदे एस.एम, सुर्यवंशी के.एस, शिंदे एस.बी,ठाकूर के.पी,ढगे मॅडम, शिंदे वी.वी व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.



0 Comments