सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार; लातूरमधुन आरोपीला ठोकल्या बेड्या; यातील एक आरोपी सोने विकून करणार होता प्रियसी सोबत लग्न-
सोलापूर : एकीकडे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असतानाच, शहरात एका खळबळजनक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी करणाऱ्या अय्युब हुसेन सय्यद (वय ५०) या लोकप्रिय तृतीयपंथी उमेदवाराची त्यांच्याच घरात उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या अंगावरील लाखो रुपयांचे दागिने ओरबाडून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लातूरच्या तीन तरुणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे यशराज उत्तम कांबळे वय 21 (राहणार बौद्ध विहार इंदिरानगर लातूर) 24 (राहणार कुंभारवाडी रेनापुर लातूर )वैभव गुरुनाथ पण गुण राहणार कुंभारवाडी लातूर अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांना 31 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपी आफताब याची मृत आयुबशी ओळख होती तेव्हा त्याच्याजवळ सोने आणि पैसे आहेत असे सांगितले होते; यातून आफताब व इतर दोन आरोपींना सोबत घेऊन खून करण्याचा प्लॅन केला आणि तिघांनी दुचाकी वर सोलापूर गाठलं. शनिवारी रात्री आयुबचा खून करून त्यांची दुचाकी आणि सोन्याची दागिने चोरून नेले .गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सदर बाजार पोलीस ठाण्याचे नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना लातूर येथून अटक केली यातील आरोपी यशराज हा कोल्हापूरला पळून जाण्याचे तयारीत होता सर्वांची चौकशी केल्यानंतर आरोपीने खुनाची कबुली दिली. आरोपी वैभव हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून यशराज ने शिक्षण सोडले आहे तर मुख्य आरोपी आफताब याच्यावर गांधी चौक व रेणापूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, विजय कबाडे ,एसपी राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पोलीस पथकाने केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे हे करत आहेत.
यशराज दागिने विकून लग्न करणार होता
आयुब सय्यद यांच्या खून प्रकरणातील एक आरोपी यशराज याला प्रेयसी सोबत लग्न करायचे होते यासाठी पैसे हवेत आयुबच्या अंगावरील सोने विकून तसेच रोकड मिळवून त्या पैशातून तो विवाहाचे स्वप्न पाहत होता त्याला विवाहासाठी त्याचे मित्र व इतर दोन आरोपी मदत करणार होते या कारणामुळे तो गुन्ह्यात सामील झाल्याचे सूत्राने सांगितले.
दागिने खरे की खोटे...
आरोपींनी खून केल्यानंतर आयुब च्या जवळील रोख रक्कम आणि सोन्याची दागिने चोरून नेले पोलिसांनी आरोपींना पकडले असून त्यांच्या जवळील दागिने जप्त करण्यात आली आहे जप्त केलेली दागिने खरे की खोटी याची तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुसऱ्या दिवशी दुपारी आयुब चे खून प्रकरण उघडकीस
या घटनेची अधिक माहिती अशी की सोलापूर मधील मुर्गीनाला येथे राहत्या घरी आयुब हुसेन सय्यद या तृतीयपंथी पण त्याचा शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. यावेळी घटनास्थळावरून सुमारे 40 तोळे सोने मोबाईल व मोटरसायकल गायब झाल्याने खुनासोबतच चोरीचाही थरारक प्रकार उघड झाला आहे. सदर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे ते घरी येऊन झोपले मात्र शनिवारी सकाळी त्यांचा काही आवाज आला नाही शेजारील शबाना फारूक शेख सकाळी वर गेले असता खोलीला बाहेरून खडी असल्याचे त्यांना दिसले दरम्यान घराजवळील दुकानात आयुब चा मोबाईल लागत नसल्याबाबत चौकशी झाल्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांनी पुन्हा वर जाऊन कडी काढली खोलीत प्रवेश करताच आयुब बेडवर मृता अवस्थेत आढळून आले त्यांनी आरडाओरड केली त्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली.
सीसीटीव्ही मध्ये तिघांचे फोटो कैद
आयुब सय्यदच्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आली आहेत रात्रीच्या सुमारास तिघे त्या ठिकाणी आल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे .खून कसा झाला व कोणी केला याचा तपास सुरू आहे मृताच्या अंगावर कोणत्याही जखमा नाहीत लवकरच संपूर्ण प्रक्रिया उघडकीस येईल असे पोलीस निरीक्षक सदर बाजार नामदेव बंडगर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

0 Comments