माळशिरस : अवैध दारू व मादक पदार्थ बंदीसाठी उपोषण करणार- बलभीम जाधव

Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस : अवैध दारू व मादक पदार्थ बंदीसाठी उपोषण करणार- बलभीम जाधव

माळशिरस :  अवैध दारू व मादक पदार्थ बंदीसाठी उपोषण करणार- बलभीम जाधव 


माळशिरस :  मळोली ता माळशिरस येथील अवैद्य दारूविक्रीच्या विरोधातील मुद्दा आता तीव्र स्वरूपात चालू झाला असून अनेक निवेदने व समोपचाराने सांगून सुद्धा मळोली गावातील अवैद्य दारू विक्री बंद होत नाही म्हणून मळोली गावातील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनाता पार्टी चे माळशिरस तालुका किसान युवा मोर्चा चे अध्यक्ष श्री बलभीम जाधव यांनी एक जानेवारी 2026 पासून उपोषणाचे आंदोलन जाहीर केले आहे. त्यांच्या या आंदोलनासाठी गावातील तरुण युवकांचा मोठा पाठिंबा मिळत असून या आंदोलनामुळे वेळापूर पोलीस स्टेशन व उत्पादन शुल्क विभाग यांच्या बेजबाबदार पणाचे वाभाडे निघत आहे.

सविस्तर व्रत असे की, मळोली येथे अवैद्य दारू, गांजा, जुगार,गुटखा, मटका असे अनेक व्यवसाय राजरोस पणे चालू असून हे बंद होण्यासाठी मळोली ग्रामपंचायत च्या माध्यमातून अनेक वेळा ग्रामसभेचे ठराव करून पोलीस स्टेशन ला दिलेले आहेत मात्र तात्पुरता स्वरूपात कारवाई करून या दारुविक्रेते यांना सोडून दिले जात आहे. असे प्रकार आता पर्यंत अनेक वेळा घडलेले असून दारुविक्रेते व  दारूबंदी करणारे यांचेमध्ये अनेक वेळा संघर्ष झाला आहे. या अवैद्य दारू विक्रीने गावातील अनेक तरुण प्रचंड व्यसनाधीन झाले असून अनेक तरुण मृत्यूमुखी पडले आहेत. सामाजिक संतुलन पूर्णतः खराब झाले असून केवळ काही रुपयांची चिरीमिरी घेऊन हे व्यवसाय प्रशासन चालू ठेवत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. या दारूबंदी साठी दैनिक पुढारी मधून अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. मात्र मठ्ठ झालेले प्रशासन कधी जागे होणार व यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करणार नाही तो पर्यंत हे आंदोलन चालूच ठेवनार असल्याचे श्री बलभीम जाधव यांनी आपल्या निवेदनात जाहीर केले आहे. या अगोदर गेली दोन वर्षांपासून पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांना याबाबत लेखी स्वरूपात कळविले आहे. मात्र जिल्हा विभागाकडून प्रेशर आल्यानंतर तेवढ्या पूरती कारवाई होऊन नंतर हे दारूविक्रेते राजरोस पणे नव्या जोमाने दारू व ताडी विक्री करीत आहेत. साळमुख येथे सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत ताडी व दारू यांचा महापूर चालू असून ताडी पिण्याने अनेक तरुणाचे लिव्हर निकामे झाले आहेत. ताडी मध्ये असणारी विविध प्रकारची रसायने शरीरास घातक ठरत असून पोट सुटणे, तोंड सुजने, किडनी व लिव्हर वरती सूज येणे ही समस्या अनेकांना चालू झाली आहे. या आगोदर 3 फेब्रुवारी 2024 रोजी अशाच पद्धतीने श्री बलभीम जाधव यांनी उपोषण वेळापूर पोलीस स्टेशन च्या विनंतीस सहकार्य करून मागे घेतले होते मात्र आता ते कोणत्याही स्वरुपात वरिष्ठ अधिकारी यांनी पूर्णतः कारवाई करण्याचे आदेश देईपर्यंत आंदोलन माघारी घेणार नाहीत हे निवेदनात स्पस्ट केले आहे. त्यांच्या या आंदोलनास व्यसनमुक्त युवक संघ व गावातील अनेक सामाजिक संघटना व युवकांनी पाठिंबा दिला आहे. वर्षाच्या प्रारंभी होणारे हे आंदोलन प्रशासन व पोलीस यांची डोकेदुखी वाढविणारे असून गावाखेड्यातील बिघडणारी तरुण पिढी व्यसनी होऊ नये यासाठी प्रयत्न करीत असलेले बलभीम जाधव यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Post a Comment

0 Comments