लोहारा पोलिसांची मोठी कारवाई; 5 किलो गांजासह दोघे ताब्यात;जेवळी येथे अवैध गांजा विक्री प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल-
₹1.05 लाखांचा गांजा जप्त; लोहारा पोलिसांची धडक कारवाई
लोहारा | प्रतिनिधी :अवैध गांजा विरोधी कारवाईदरम्यान लोहारा पोलीस ठाण्याच्या पथकाने दि. 18 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.20 वाजता मोठी कारवाई केली. लोहारा पोलीस ठाणे हद्दीतील जेवळी (उत्तर) येथे आरोपी नामे गोरीबी जबार शेख (वय 78) व अली अकबर अब्दुल शेख, दोघेही रा. जेवळी उत्तर, ता. लोहारा, जि. धाराशिव, यांच्या राहत्या घरातून 5.266 किलो वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹1,05,320 इतकी असून, हा गांजा चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगल्याचे आढळून आले.
या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8(क), 20(बी) ii(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

0 Comments