देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा झाला; पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळ कार झाडावर आदळून भीषण अपघातात ५ जण जागीच ठार -Solapur -pune national Highway Accident News

Hot Posts

6/recent/ticker-posts

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा झाला; पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळ कार झाडावर आदळून भीषण अपघातात ५ जण जागीच ठार -Solapur -pune national Highway Accident News

 देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा झाला; पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळ कार झाडावर आदळून भीषण अपघातात  ५ जण जागीच ठार -


सोलापूर :  पनवेल मुंबईहून अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे दर्शनासाठी निघालेल्या ईरटीका कारचालकाचे नियंत्रण सुटून  कार झाडावर आदळुन झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झालं. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे . ही दुर्दैवी घटना पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळ तालुक्यातील देवडी पाटी येथे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमाराची घटना घडली.

अपघात एवढा भीषण होता की दीड फूट व्यासाच्या झाडाचे कारच्या धडकीने दोन तुकडे झाले तर कारचा चक्काचूर   झाला  आहे. अपघातातील मृत पाच जण हे पनवेल येथील असून यामध्ये एक महिला आश्चर्यकाररीत्या बचावली आहे. मयतांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना तब्बल दोन तासाचा कालावधी लागला अपघाताच्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता .मृतदेहाची अवशेष देखील गाडीमध्ये विखुरलेली अवस्था रूपात होते स्थानिकांनी ही परिस्थिती अतिशय भयानक स्वरूपात माध्यमांना सांगितली यावरून या अपघाताची तीव्रता लक्षात येते.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पनवेल खारघर येथून ज्योती टकले यांचे मित्र विशाल भोसले यांनी देवदर्शनाला जाण्यासाठी घेतलेल्या ईरटीका कार क्रमांक Mh- 46 झेड 45 36 मधून अर्चना भंडारे ,माला साळवे ,विशाल भोसले ,अमर पाटील ,आनंद माळी हे सहा जण अक्कलकोट ला जाण्यासाठी म्हणून पनवेल मधून दुपारी अडीचच्या सुमारास निघाले .त्यावेळी ही गाडी अमर पाटील हे चालवत होते पुणे सोलापूर हायवेने अक्कलकोट कडे जात असताना टेंभुर्णी गावाजवळ सर्वजण जेवणासाठी थांबले जेवण झाल्यानंतर परत ते पुणे सोलापूर महामार्गाने अक्कलकोटच्या दिशेने वेगाने जात असताना रात्री साडेअकराच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील देवडी पाटीजवळ त्यांची गाडी आली असता समोर एक ट्रक सोलापूरच्या दिशेने जात होता त्यावेळी ही गाडी चालवणारे अमर पाटील यांना अचानक तो ट्रक दिसल्यामुळे त्यांनी गाडी धडकणार असा अंदाज घेऊन गाडी डाव्या बाजूला खाली वळवली गाडीचा वेग जास्त असल्यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटून त्यांची गाडी रस्त्याच्या खाली उतरून बाजूच्या झाडावर जाऊन आदळली.

त्यामध्ये चालक अमर पाटील यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर ज्योती टकले या एकमेव महिला यामध्ये बचावली असून त्यांच्यावर मोहोळ येथे उपचार सुरू आहेत. मृताची ओळख पटवताना अतिशय मुश्किल झाले होते. हा अपघात एवढा भीषण होता की हे या अपघातामधील गाडीची अवस्था पाहून लक्षात येते. ईरटीका कार ही किमान ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने धावत असावी तर असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे .कारण ही कार टेंभुर्णी येथील टोलनाक्यावरून पास झाल्यानंतर केवळ 15 ते 20 मिनिटात अपघात स्थळापर्यंत आली असल्याचा अंदाज आहे. महामार्गाच्या दुरुस्तीची आणि ओव्हर ब्रिजचे काम ठीक ठिकाणी सुरू असून तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या भाविकांनी आवश्यक ती काळजी घेऊन प्रवास करावा तसेच रात्रीचा प्रवास टाळावा आणि असे अपघात होण्यापासून काळजी घ्यावी अशी आव्हान पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments