सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कुलकर्णी यांचा हिप्परगा ताड येथे नागरी सन्मान

Hot Posts

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कुलकर्णी यांचा हिप्परगा ताड येथे नागरी सन्मान

 सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कुलकर्णी यांचा हिप्परगा ताड येथे नागरी सन्मान 


---------------------------------------

 

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे हिप्परगा ताड येथील सहयोग निर्मीती सामाजिक संस्थेचे संस्थापक रमाकांत बापु कुलकर्णी यांचा हिप्परगा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित नागरी सन्मान केला

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजूरे, सरपंच दिपाली वाघमारे, डॉ सुर्यकांत आगलावे, सहयोग निर्मीतीच्या संस्थापिका मेघनाताई कुलकर्णी, अंबव्वा महिला मंडळाच्या अध्यक्षा कस्तुरा कारभारी, शंभुराजे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे दिनेश सलगरे,लोकप्रबोधन संस्थेचे धनाजी धोतरकर, पौर्णिमा संस्थेच्या बाबई चव्हाण, वाॅटर संस्थेचे अनिल हिवाळे, सामाजिक कार्यकर्त्या बबिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी रमाकांत कुलकर्णी यांना केंद्रशासनाने व महाराष्ट्र शासनाने पाणी या विषयावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरव केला व यशदा पुणे यांच्या वतीने चालणा-या प्रशिक्षणासाठी साधनव्यक्ती म्हणून नियुक्ती केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला 

यावेळी मधुकरराव चव्हाण, रमाकांत कुलकर्णी, डॉ सिद्रामप्पा खजूरे,कस्तुरा कारभारी,बबीता पाटील,मनिषा धुते यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ मल्लीनाथ बिराजदार यांनी, प्रास्ताविक अरुण दळवे यांनी तर आभार सर्जेराव वाघमारे यांनी मानले .यासाठी  कमलाकर रणदिवे,बालाजी कोरे ,कलप्पा टाकणे, महेश विभुते, विजयकुमार दळवे, बाबा लोहार, संजय ढाले, दत्तात्रय बिराजदार, बसवेश्वर पाटील, बाबुशा हब्बू, सिद्धेश्वर पाटील, वसंत ढाले, नाना माळी ,शंकर घोडके, वैभव टाकणे, बाबारावं पांचाळ यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.

Post a Comment

0 Comments