विहीर मंजूर करून देण्यासाठी 70 हजाराची लाच घेताना सरपंच एसीबीच्या जाळ्यात धाराशिव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई-
बीड : शासकीय योजनेतून सिंचन विहिरी मंजूर करून देण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना केज तालुक्यातील तरनळी ग्रामपंचायतच्या सरपंचाला लाच घेताना रंगीहात पकडण्यात आले .लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचून कारवाई केली महादेव प्रताप खेडकर वय 35 असे लाचखोर सरपंचाचे नाव आहे.
या घटनेबाबत एसीबीकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार आणि इतर त्यांच्यासोबत असलेले तिघांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींसाठी प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावावर सही करण्यासाठी आणि बिडीओ तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ते मंजूर करून आणण्यासाठी खर्च लागेल; असे सांगून आरोपी सरपंच महादेव खेडकर यांनी प्रत्येक वेळी मागुन २५ हजार रुपये प्रमाणे एकूण एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने या प्रकरणी धाराशिव लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांच्याकडे तक्रार नोंदवली होती या तक्रारीची पडताळणी 23 आणि 24 डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली .स्वतःसाठी 10000 आणि इतरांसाठी प्रत्येकी 20000 अशा 69 हजार रुपयावर व्यवहार ठरला 1 जानेवारी 2026 रोजी पहिला सापळा रचण्यात आला होता .मात्र त्यावेळी लाच न घेता सरपंचाने पुन्हा बोलवले होते अखेर 13 जानेवारी 2026 रोजी केज येथील पंचायत समितीच्या पाठीमागे असलेल्या खेडकर यांच्या रूमवर सापळा लावण्यात आला तेथे 70 हजार रुपयाची लाच स्वीकारताना पथकाने त्यांना पंचा समक्ष ताब्यात घेतले .या प्रकरणी आरोपी विरूध्द केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदरील कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव चे पोलीस निरीक्षक विजय वगैरे पोलीस उपाधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये बीड एसीबी चे पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांचाही समावेश होता.

0 Comments