इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचा रविवार दि.११ जानेवारी रोजी होणार प्रकाशन सोहळा.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
सामाजिक ,शैक्षणिक, धार्मिक व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा ही पुरस्कार देऊन होणार सन्मान.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
मंगरुळ:-(चांदसाहेब शेख)-इटकळ ग्रामीण पत्रकार संघ व शंभूराजे बहुउद्देशीग सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १३ वर्षापासून इटकळ ग्रामीण पत्रकार संघाची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत आहे याही वर्षी २०२६ ची दिनदर्शिका व परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा रविवार दि.११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता विवांता रिसॉर्ट इटकळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण साहेब हे लाभणार आहेत त्याचबरोबर उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य अझहर मुजावर हे असुन या कार्यक्रमास प्रमूख अतिथी म्हणून
हभप. विठ्ठल महाराज दिंडेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंतराव वडगावे,युवा नेते ऋषी भैय्या मगर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के,शेंडगे रिसर्च सेंटरचे डॉ. राजाराम शेंडगे,डॉ जितेंद्र कानडे , डॉ . नागनाथ कानडे,नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे, नगरसेवक दत्तात्रय दासकर, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके हे असुन सरपंच साहेबा क्षिरसागर, उपसरपंच फिरोज मुजावर, उद्योजक अब्दुल शेख, हारून शेख,पोलीस पाटील विनोद सलगरे, तंटामुक्त अध्यक्ष विकास पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागनाथ जळकोते, हभप.अशोक जाधव गुरूजी व विवांता रिसॉर्टचे शिवानंद पल्ली, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. या दिमाखदार सोहळ्यासाठी परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय वारकरी, शेती, उद्योग , व्यापार व जागरूक नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे, उपाध्यक्ष लियाकत खुदादे ,सचिव केशव गायकवाड, सदस्य चांदसाहेब शेख, बालाजी गायकवाड, नामदेव गायकवाड यांनी केले आहे.

0 Comments