धाराशिव : तरुणीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येस प्रवर्त केल्याप्रकरणी तरुणी विरुद्ध गुन्हा दाखल-
धाराशिव : पाच वर्षापासून तरुणास वारंवार फोन करून त्रास देत असल्याने एका 38 वर्षीय तरुणाने तरुणीच्या सततच्या ञासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील बेगबा शिवारात घडली आली आहे. याप्रकरणी आरोपी तरुणी विरुद्ध आत्महत्येस प्रवर्तक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय तात्याराव राऊत असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे तर शितल जगदीश राऊत असे आरोपी तरुणीचे नाव आहे ही घटना दिनांक 16 रोजी घडली.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आरोपी नामे-धनंजय तात्याराव राउत, वय 38 वर्षे, रा. एसटी कॉलनी सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.16.12.2025 रोजी 21.40 वा.पुर्वी धाराशिव येथे बेगडा शिवारात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-शितल जगदीश राउत, वय 34 वर्षे, रा. पुणे यांचे मयत धनंजय यांचे लग्न ठरले होते परंतु आरोपी ही दुसऱ्या व्यक्तीसोबत गेल्याने मयत धनंजय याचे लग्न दुसऱ्या मुली सोबत होवून संसार चालु असताना मागील पाच वर्षा पासुन आरोपी ही मयत धनंजय यास वांरवांर फोन करुन त्रास देत असल्याने तिच्या त्रासाला कंटाळुन मयत धनंजय यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विशाल तात्याराव राउत, वय 35 वर्षे, रा. एसटी कॉलनी सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.17.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-108 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.

0 Comments