सोलापूर : तुरुंगातून भाजपच्या शालन शिंदे विजय सरवदे खुन प्रकरणात आरोपी; प्रचार न करता घेतली १० हजारांवर मते-
सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक दोन (क) मधील मनसे नेते बाळासाहेब सरवदे खून प्रकरणी तुरुंगात असलेल्या भाजपच्या उमेदवार शालन शिंदे या तब्बल दहा हजार 769 मते घेऊन निवडून आले आहेत .निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याच्या दिवशी खुनाची घटना घडली होती .त्यावेळी उमेदवार असलेल्या शालन शिंदे यांच्यासह अनेकाला पोलिसांनी ताब्यात घेतली होते. त्यामुळे त्यांना प्रभागात प्रचार करता आला नाही तरीही त्या चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांचा खून झाला होता भाजप उमेदवार शालन शिंदे व त्यांचा संपूर्ण कुटुंबिय खून प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून २ जानेवारी रोजी दुपारी दोन गटांमध्ये वाद झाला होता.त्या दिवसापासून भाजप उमेदवार शालन शिंदे तुरुंगात आहेत कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता शिंदे निवडून आले आहेत उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉक्टर किरण देशमुख हे या प्रभागात भाजपचे नेतृत्व करत होते.
देशमुख यांनाही तब्बल दहा हजार 915 मते मिळाली आहेत त्यांच्या पॅनलचे असलेल्या नारायण बनसोडे कल्पना कारभारी हे निवडून आले आहेत शालन शिंदे या तुरुंगात असताना आणि कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता १० हजार 767 इतक्या मताधिक्याने निवडून आले आहेत. भाजपच्या शिंदे आणि आफ्रीन पठाण यांच्यात थेट लढत झाली होती .आफ्रीण पठाण यांचा पराभव करत शालन शिंदे विजय ठरले आहेत शिंदे या तुरुंगात असल्या तरी त्यांचे पती शंकर आणि मुलांसह 15 जण तुरुंगातच आहेत. एकंदरीत संपूर्ण कुटुंब तुरुंगात असतानाही कोणत्याही प्रकारचा प्रचार केला नाही मात्र शालन शिंदे या भरघोस मतांनी निवडून आल्यामुळे सर्वत्र या विजयाची चर्चा होत आहे.

0 Comments