बांध कोरल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-Crime News-

Hot Posts

6/recent/ticker-posts

बांध कोरल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-Crime News-

बांध कोरल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना-


धाराशिव : बांध कोरल्याच्या कारणावरून व मागील भांडणाची कुरापत काढून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची गंभीर घटना परंडा तालुक्यातील पोतराज शहरात घडली आहे याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी नामे- ब्रम्हदेव आबा शिंदे, धुळदेव आबा शिंदे, सुरज धुळदेव शिंदे, सर्व रा. भोत्रा ता. परंडा  जि. धाराशिव यांनी  दि.12.01.2026 रोजी 10.30 वा. सु.भोत्रा येथील शेत गड नं 20(ब) येथे फिर्यादी नामे-राजेंद्र ज्ञानदेव शिंदे, वय 30 वर्षे, रा.भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले.जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजेंद्र शिंदे यांनी दि.12.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 352, 351(2), 3(5) सह 4/25 शास्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

याच घटनेत आरोपी  नामे-राजेंद्र ज्ञानदेव शिंदे, ज्ञानदेव विठ्ठल शिंदे रा. भोत्रा ता.परंडा जि. धाराशिव यांनी  दि.12.01.2026 रोजी 10.00 वा. सु. शेत गट नं 20 (अ)मध्ये भोत्रा शिवार येथे फिर्यादी नामे- धुळदेव आबा शिंदे, वय 39 वर्षे, रा.भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतातील बांध कोरल्याच्या  कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा सुरज शिंदे व भाउ ब्रम्हदेव शिंदे यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-धुळदेव शिंदे यांनी दि.12.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत.      

Post a Comment

0 Comments