मुंबई : अनेक वर्षापासून खरखरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा अखेर बिगुल दि, 13 रोजी वाजला आहे. त्यामुळे आता शहराबरोबरच गाव गाड्यातील राजकारणही तापणार आहे .
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदे घेऊन याबाबत घोषणा केली. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. जिल्हा परिषेदेच्या निवडणुकीसाठी १६ जानेवारी २०२६ रोजी सूचनेचे प्रकाशन होणार आहे. अर्ज दाखल करण्याची दाखल १६ जानेवारी ते २१ जानेवारी अशी मुदत असणार आहे. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत २७ जानेवारी २०२६ तर अंतिम उमेदवारी व निवडणूक चिन्ह वाटप २७ जानेवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत असणार आहे. मतदानाचा दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ६.३० ते सायंकाळी ५.३० मतमोजणीचा दिनांक ७ फेब्रुवारी होणार आहे.
या निवडणुकांसाठी १ जुलैची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्र असमार आहेत. तसेच १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेसाठी निवडणूक होणार आहे . तसेच पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर , छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्हा परिषदांसाठीही निवडणूक होणार आहे. तर मतदानाच्या २४ तास आधी प्रचाराची सांगता होणार आहे.

0 Comments