धाराशिव : विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधमास १० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथे एका विवाहित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने 31 डिसेंबर 2025 रोजी दहा वर्षे सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या घटनेची थोडक्यात माहिती अशी की 19 एप्रिल 2021 रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पीडित महिला आपल्या घरात एकटी असताना आरोपी मंगेश बेंद्रे यांनी तिचा फायदा घेतला. त्यांनी घरात अनधिकृत पणे प्रवेश करून लैंगिक अत्याचार केला दरम्यान त्याच वेळी तिचे पती अचानक घरी आले त्यांना पाहताच आरोपीने तिथून पळ काढला या धक्क्यातून सावरत असतानाच आरोपीने पुन्हा पीडितेचा पाठलाग करून तिला त्रास देणे सुरूच ठेवले होते .या जाचाला कंटाळून अखेर पिडीतिने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत आनंद यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले .या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) ए.एस आवटे यांच्या न्यायालयात पार पडली. या सुनावणी दरम्यान पिडीता आणि तिच्या पतीची साक्ष अत्यंत प्रभावी ठरली .सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील एडवोकेट जयंत .व्ही. देशमुख यांनी जोरदार युक्तिवाद करून आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केली .सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जवाब ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मंगेश बेंद्रे याला भारतीय दंड विधान संहिता कलम 376 नुसार दहा वर्षे सश्रम करावास व एक हजार रुपये दंड आणि कलम 323 नुसार एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

0 Comments