मौजे केशेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विविध कार्यक्रमानी साजरी-
---------------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे):- 12 जानेवारी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पो. पाटील कमल मलाय्या स्वामी होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक प्रकाश कांबळे,उपाध्यक्ष निलुशा जळकोटे, सोमेश्वर स्वामी, उज्वला कांबळे आणि माता पालक
उपस्थित होते.
प्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेतील मुलांची सुंदर भाषणे झाली. यावेळी मुलींनी जिजाऊच्या कार्याची ओळख करून देणारी गाणी नृत्यासह सादर केली. यात जिजाऊ वंदना, जिजाऊच्या ओवी, जिजाऊचा पाळणा, गाणी घेण्यात आली. आज शाळेतील सर्व मुली जिजाऊंच्या वेशभूषा करून आल्या होत्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील मुलींनीच केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी शिक्षक बालाजी कदम,गोरोबा गायकवाड, बालाजी कुसुमकर, दणाने मॅडम, हब्बू मॅडम, दूधगी मॅडम, क्षीरसागर मॅडम, बागडे मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली.
प्रास्ताविक विध्यार्थिनी कुमारी कावेरी राठोड हिने केले. आभार कुमारी श्रावणी कोळी हिने मानले.

0 Comments