येवती पंचायत समिती गणातून उबाठा गटाकडुन फुलाबाई मधुकर लोंढे उमेदवारीसाठी इच्छुक-Yevti Panchyatsamati Election

Hot Posts

6/recent/ticker-posts

येवती पंचायत समिती गणातून उबाठा गटाकडुन फुलाबाई मधुकर लोंढे उमेदवारीसाठी इच्छुक-Yevti Panchyatsamati Election

येवती पंचायत समिती गणातून उबाठा गटाकडुन  फुलाबाई मधुकर लोंढे उमेदवारीसाठी इच्छुक 


चिवरी/ प्रतिनिधी बिभिषन मिटकरी   : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून तालुक्यातील सर्वच मतदार संघात जो तो आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठीच धडपडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहापूर गटातील येवती पंचायत समिती गण हा पुन्हा सलग दुसऱ्यांदा एस.सी. महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या येवती पंचायत समिती गणातून मौजे चिवरी येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते मधुकर तुळशीराम लोंढे यांच्या पत्नी  फुलाबाई मधुकर लोंढे या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून  उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. मधुकर लोंढे यांनी गाव परिसरात  शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण केली होती . मधुकर लोंढे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास दादा पाटील यांच्याकडे इच्छुक अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीही 2007 साली मधुकर लोंढे यांनी शिवसेने मधून पंचायत समिती गणत निवडणूक लढवली होती. आता त्यांच्या पत्नी फुलाबाई मधुकर लोंढे या निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत. मधुकर लोंढे यांनी गावांमध्ये शिवसेना शाखा स्थापनेपासून ते आजतागायत एकनिष्ठ काम करत आले आहेत त्यामुळे येवती पंचायत समिती गणातून त्यांच्या पत्नी फुलाबाई लोंढे यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी नागरिकांतून  होत आहे.

एकंदरीत तालुक्यातील पंचायत समितीच्या गणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या इच्छुकांची झुंबड होत असल्याचे दिसून येत आहे.सौ . फुलाबाई मधुकर लोंढे  यांचीशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व सामान्यांना वाड्या वस्त्या पर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. येवती पंचायत समिती गणातून  उबाठा गटाकडून  जर उमेदवारी दिली तर सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवणार असल्याचे ही सौ.  फुलाबाई मधुकर लोंढे  यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

उबाठा गटाचे आमदार कैलास दादा पाटील यांच्याकडे उमेदवारीसाठी इच्छुक अर्ज सादर करताना मधुकर लोंढे

Post a Comment

0 Comments