धाराशिव: कोंबड्या चोरीच्या प्रकरणात जाब विचारल्यावरून एकाचा खून आरोपीस जन्मठेप व दंडाची शिक्षा भूम अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल-
धाराशिव : भूम तालुक्यातील ईट येथे तीन वर्षांपूर्वी चोरीच्या प्रकरणात जाब विचारल्याच्या कारणावरून डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून करण्यात आलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे .ही शिक्षा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश (Additional Session Court) बी.जी धर्माधिकारी यांनी सुनावली आहे.
या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की भूम तालुक्यातील ईट येथील गारवा जाहिराती भोसले याने गावातीलच एकाचे शेत राखणेला घेतले होते या राखणेच्या क्षेत्रातील कोंबड्या आरोपी श्याम जालिंदर भोसले यांनी चोरल्या होत्या. या प्रकरणावरून गारवा भोसले यांनी आमच्या राखणेच्या शेतातील कोंबड्या का चोरल्या याचा जाब शाम भोसले यास विचारला व यापुढे चोऱ्या केल्यास पकडून देऊ; असे बजावले होते हा राग मनात धरून गारवा जाहिराती भोसले याचा आरोपी श्याम जालिंदर भोसले यांनी एका विधी संघर्ष बालकाच्या मदतीने डोक्यात कुराडीने घाव घालून खून केला होता .ही घटना दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता सुमारास ईट शिवारातील सरकारी गायरानावरील भोसले वस्ती येथील बापू महादेव राऊत यांच्या गोठ्यात घडली होती.
याप्रकरणी आरोपींच्या विरोधात कलम 302 34 भारतीय दंड विधान संहितेनुसार (indian pinal Code)वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता .या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एस .एस दळवे यांनी केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी दोषारोपपत्र(Chargesheet) न्यायालयामध्ये दाखल केले होते .या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.जी धर्माधिकारी यांच्यासमोर झाली .यावेळी सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट किरण कोळपे यांनी मांडलेली बाजू सुनावणी कामी एकूण १३ साक्षीदारांचे जबाब नोंदवले .या प्रकरणांमध्ये कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार (Eye witness)नव्हता परंतु फिर्यादी व इतर साक्षीदारांच्या व पोलीस तपासातून न्यायालयासमोर आलेला पुरावा तसेच परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून आरोपीस न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे .यावेळी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस फौजदार बाजीराव बळे यांनी काम पाहिले.

0 Comments