लातुर : वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी २५०० रुपयांची लाच घेताना लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात-Acb Trap Latur Talathi

Hot Posts

6/recent/ticker-posts

लातुर : वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी २५०० रुपयांची लाच घेताना लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात-Acb Trap Latur Talathi

लातुर : वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी २५०० रुपयांची लाच घेताना लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात-


लातूर : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच जिल्ह्यामध्ये महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या कारभाराने सुरुवात केल्याचे म्हणायला काय वावगे ठरणार नाही. अशीच खळबळ जनक घटना निलंगा तालुक्यातील गुजरंगा सज्जाचे तलाठी यांनी श्रावणबाळ इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लाच घेणारा तलाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. कमलाकर मुंडे असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. यामध्ये उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयाची मागणी केली होती तर तडजोडी  अंती ठरलेले 2500 रुपये घेताना मुंडे याला  रंगेहात  एसीबीच्या पथकाने पकडल्याची घटना दिनांक १ रोजी घडली. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत एसीबी कडून मिळालेली अधिक माहिती अशी की निलंगा तालुक्यातील सोनखेड पो. सावरी येथील तक्रारदाराच्या आई विमलबाई मोहन सोळुंके  यांना शासकीय योजनांचा लाभ लाभ घेण्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता होती .याकरता गुंज सध्याचे तलाठी कमलाकर मुंडे यांनी पाच हजार रुपयाची मागणी केली होती या संदर्भात लाच लचपत प्रतिबंधक विभागाकडे 31 डिसेंबर रोजी तोंडी तक्रार करण्यात आली होती .त्यानुसार गुरुवारी दुपारी निलंगा येथील दत्त नगरातील खाजगी तलाठी कार्यालयात दोन हजार पाचशे रुपये स्वीकारताना मुंडे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात  ताब्यात घेतली याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांच्या फिर्यादीवरून नमूद तलाठी विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Post a Comment

0 Comments