सोलापुर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह मुलीचा खून करणाऱ्या आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा, ९ वर्षानी खटल्याचा न्यायालयात निकाल-
सोलापूर : कर्ज फेडण्याकरता माहेरहून पैसे आणत नसल्याने तसेच चारित्र्यावरील संशयावरून पत्नीसह पाच वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारून दोघीचा निगुण खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा पंढरपूर येथील मुख्य अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी ठोठावली .
प्रशांत गजानन वट्टमवार वय (45) राहणार रोपळे असे शिक्षा झालेले आरोपीचे नाव आहे प्रशांत हा पत्नी वृषाली वट्टमवार हिला बचत गट व फायनान्स चे कर्ज फेडण्याकरता माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून त्रास दिला होता तसेच चारित्र्यावर ही संशय घेत होता याविषयी तिने आपल्या चुलत्याला कल्पना दिली होती. दरम्यान दिनांक 21 जुलै 2016 रोजी वृषाली ही झोपलेली असताना प्रशांतने डोक्यात लोखंडी पाइपने मारून तिचा खून केला तसेच ही घटना पाहिली असल्याने मुलगी ज्ञानेश्वरी वय 5 हीच डोक्यात पाईप मारून आणि तोंड दाबून ठार केले याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केली होती.
या खटल्यात सरकारतर्फे 18 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. या तपास अधिकारी खराडे वृषाली हिचा भाऊ मुकुंद पारसवार, विजय पारसवार आरोपीचा चुलता दत्तात्रय वट्टमवार बस चालक शिवाजी तोटेवाड सरपंच दिनकर कदम ,डॉ. स्वाती बोधले ,रोहिणी पाटील आदींच्या स्वाक्षरी महत्वाचे ठरल्या. सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट सारंग वांगीकर यांनी कामकाज चालवले घटनेच्या आदल्या दिवशी मयत वृषाली हिने चुलते दत्तात्रेय यांना पती वादविवाद करीत असल्याचे सांगितले होते. तसेच आरोपी प्रशांत यांनी पोलीस ठाण्यात फोन करून पत्नीशी वाद होत असल्याचे कळवले होते .एकंदरीत नोंदवलेल्या साक्षी आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून सरकार पक्षांनी गुन्हा सर्व संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध केला असून आरोपीला खोटी पणाने गुंतवण्याची कोणतेही कारण नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला सर्व बाबींचे अवलोकन करून न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि दहा दहा हजार रुपये दंडाचे शिक्षा ठोठावली. यात पर्यवक्षण अधिकारी म्हणून तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार अनिता नागरळे होत्या.
खून करून आरोपी पोलीस ठाण्यात;बचावात दरोड्याचा संशय
पत्नी व मुलीचा खून केल्यानंतर आरोपी प्रशांत वट्टमवार यांनी स्वतः तालुका पोलीस ठाण्यात हजर होत तशी कबुली दिली होती. खटल्याच्या सुनावणी दरम्यान खुनाची घटना खोटी असून आरोपीच्या घरी दरोडा पडला होता त्यावेळी आरोपी फिरायला गेलेला होता तसेच मयत वृषाली ती माहेरला प्रॉपर्टी हक्क सांगत होती त्याचा राग धरून तिच्या भावाने मारेकरी घालून खून केला या घटनेविषयी संशय निर्माण होतो व त्याचा फायदा आरोपीला द्यावा बचाव पक्षाने केला.

0 Comments