मौजे केशेगाव येथील पो.काँ.सिध्दाराम गावडे यांचे अल्पशा आजाराने निधन-
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (प्रतिनिधी):- तुळजापुर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील रहिवाशी व दौंड येथे कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल सिध्दाराम आप्पाराव गावडे (वय ३६ वर्ष) यांचे ३१ डिसेंबर रोजी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर केशेगाव येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळाऊ स्वभाव असलेले सिध्दाराम गावडे यांच्या निधनाने गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात आई, वडील, आजी,भाऊ,पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. केशेगाव येथील सरपंच मल्लिनाथ गावडे यांचे ते वडील बंधू होत.

0 Comments