सरत्या वर्षात तुळजापूर तालुक्याला हादरवणाऱ्या घडामोडी बिबट्याची दहशत अतिवृष्टीचा कहर अपघाताचे सत्र आणि राजकीय घडामोडी वर्ष ठरले वादळी
तुळजापूर : सरत्या 2025 या वर्षात तुळजापूर तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती ,गुन्हेगारी अपघात ,अपघात तसेच राजकीय उलथापालथ असे अनेक चढउतारांचा अनुभव घेतला.बिबट्याच्या दहशती पासून ते वाघाच्या दहशती पर्यंत तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकरी नुकसानी पर्यंत तर महामार्गावरील भीषण अपघातापासून ते एक ना अनेक घटनांमुळे संपूर्ण तालुका व राज्याचे लक्ष तुळजापूर तालुक्याकडे वेधले गेले.
वाघ बिबट्याची दहशत कायम
टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघाने गेल्या वर्षभरापासून येडशी अभयारण्य, बार्शी तसेच तुळजापूर तालुक्यातील काही भाग पिंजून काढला होता. तसेच वाघा बरोबरच बिबट्यानेही या भागासह तालुक्यात मुक्त संचार करत दहशत निर्माण केली बिबट्याने पाळीव जनावरावर केलेले हल्ल्याची संख्या ही शतकाच्या दिशेने जात असून संबंधित शेतकऱ्यांना वनविभागाकडून मदत देण्यात आली आहे मात्र वाघाला पकडण्यासाठी आलेल्या रेस्क्यू टीमला अद्याप यश आलेले नाही त्यातच बिबट्याच्या हल्ल्यामुळे तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत वाघ किंवा बिबट्याकडून कोणतीही मानवी जीवित हानी नाही.
पोलीस यंत्रणा समोरील गंभीर आव्हाने
तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. नळदृग पोलीस ठाणे ,तामलवाडी पोलीस ठाणे या हद्दीमध्ये पूर्व वैमान्यातून, पैशाच्या व्यवहारातून, शेतीच्या वादातून अनेक खून प्रकरण अपहरण प्रकरणाच्या घटना घडल्या आहेत तर तुळजापूर शहरातील ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोडही याच वर्षात झाला. तालुक्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत बस स्थानकावरील चोऱ्या व घरफोडचे प्रमाण हे वाढले आहे याचबरोबर पोलिसांनी जुगार व अवैध दारू विक्रीवर कारवाई वाढवल्या असल्याचे दिसून आले.
अतिवृष्टीचा शेतकऱ्यावर घाला
तालुक्यामध्ये यंदा मे महिन्याच्या दहा तारखेपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र हाच पाऊस सतत सहा महिने होत गेल्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .प्रथमच पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्व प्रकल्प भरले सर्व साठवण तलाव पाझर तलाव कोल्हापुरी बंधारे तसेच ओढे नद्या नाल्यांना महापूर आला सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाण नुकसान झाले शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले .
विविध अपघातात अनेकांचा मृत्यू
यंदा तालुक्यामध्ये सोलापूर- हैदराबाद महामार्गावर अनदुर जवळ क्रुझरचा डिव्हायडर ला धडकून भीषण अपघात झाला यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तसेच नळदृगच्या आलियाबाद घाटामध्ये दोन मोटरसायकल स्वारांचा जीव गमवावा लागला. त्याचबरोबर नळदृग तुळजापूर रोडवरही अपघातात जीव गमवावा लागला. नवीन वर्षाच्या पूर्व संधेलाच केशेगाव येथील चार शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
विकास व राजकीय घडामोडी
तुळजापूर तालुक्यामध्ये शहरातील बस स्टॅन्ड पूर्णत्वास आले न्यायालयीन इमारत पूर्णत्वास झाली. तसेच तालुक्यातील विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे तालुक्यातील लोकप्रतिनिधी सांगितले आहे .राजकीय पातळीवर तालुक्यामध्ये तुळजापूर नळदृग नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या चुरशी पाहिला मिळाल्या . एकंदरीत एकीकडे विकासाचे नवे मार्ग खुले होत असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती अपघात गुन्हेगारी आणि सामाजिक प्रश्नांनी तुळजापूर तालुक्याला वर्षभर अस्थवस्थ ठेवले तर सरत्या 2025 या वर्षातील या घडामोडी तुळजापूर तालुक्यासाठी लक्षवेधी व आव्हानात्मक ठरले आहेत.

0 Comments