मौजे इटकळ येथे स्वर्गीय विजयकुमार गायकवाड यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर व खाऊ वाटप.
*
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
विजयकुमार गायकवाड प्रतिष्ठान व मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात आला उपक्रम.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
तब्बल ४५ युवकांनी रक्तदान शिबिरात घेतला सहभाग.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (प्रतिनिधी):- मौजे इटकळ स्वर्गीय विजयकुमार गायकवाड यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुला मुलींना खाऊ वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.यावेळी भव्य रक्तदान शिबिरास तरुणांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला तब्बल ४५ रक्त दात्यानी रक्तदान केले मल्लिकार्जुन ब्लड बँक सोलापूर यांनी यावेळी रक्त संकलन केले.तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुला मुलींना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील ,तुळजापूर तालुक्याचे युवा नेते ऋषिकेश मगर, माजी जि. प.सदस्य अझर मुजावर,तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र दादा आलूरे धाराशिव किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप भोकरे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष लियाकत खुदादे, हारून शेख , धाराशिव जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अब्दुल शेख ,माजी पंचायत समिती सदस्य अरुण दळवे ,पत्रकार दिनेश सलगरे , सतीश पाटील , हभप.अशोक जाधव गुरूजी ,हरीश राठोड ,पत्रकार केशव गायकवाड ,नामदेव गायकवाड ,शेखर क्षीरसागर ,रामदास साखरे ,सादिक मुजावर ,दादा भोपळे, अफसर शेख , मुरली दादा शिनगारे ,हनुमंत देडे ,सहदेव देडे यांच्यासह बहुसंख्य मित्र मंडळी उपस्थिती होते. स्वर्गीय विजयकुमार गायकवाड यांच्या चौथ्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन विजयकुमार गायकवाड प्रतिष्ठानचे दयानंद गायकवाड व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.


0 Comments