चाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेस लुटले- सोन्याचे दागिने लंपास परंडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल-Dharashiv Crime Latest News
- धाराशिव : शेताकडे जात असताना अनोळखी तीन जनाने एका 63 वर्षीय वृद्ध महिलेस तोंड दाबून दगडाने व चाकूने मारहाण करण्याची धमकी देत तिच्या गळ्यातील सोन्याचे 16 हजार रुपये किमतीचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली .ही घटना दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजता सुमारास कृषी विभागाच्या हद्दीत क्षेत्र सोनारी शिवारात घडली याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी नामे- प्रमिला भगवान आगरकर, वय 63 वर्षे, रा. आगरकर गल्ली परंडा ता. परंडा जि. धाराशिव या दि. 16.03.2026 रोजी 11.00 वा. सु. कृषी विभागाचे हद्दीत क्षेत्र सोनगिरी शिवारातील शेताकडे जात असताना अनोळखी तीन इसमांनी मोटरसायकलवर येवून फिर्यादीचे तोंड दाबुन, दगडाने व चाकुन मारहाण करण्याची धाक दाखवून गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसुत्र व कानातील फुले असे एकुण आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 16,000₹ किंमतीचे बळजबरीने चोरुन घेवून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रमिला आगरकर यांनी दि.16.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 309(4), 3(5) गुन्हा नोंदवला आहे.

0 Comments