दहावीच्या परीक्षा केंद्रावर थरार वर्गात घुसून विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला पुणे जिल्ह्यातील घटना-Pune Secondary School centre exam

Hot Posts

6/recent/ticker-posts

दहावीच्या परीक्षा केंद्रावर थरार वर्गात घुसून विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला पुणे जिल्ह्यातील घटना-Pune Secondary School centre exam

दहावीच्या परीक्षा केंद्रावर थरार वर्गात घुसून विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला पुणे जिल्ह्यातील घटना-Pune Secondary School centre exam 


पुणे : पुणे जिल्ह्यातील ओतूर तालुका जुन्नर परिसरातून एक अत्यंत धकादायक आणि खळबळजनक  घटना समोर आली आहे येथील गाडगे महाराज परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू असताना एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने 16 वर्षीय विद्यार्थ्यांवर कोयत्याने खुनी हल्ला चढवला या जीवघेने हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून त्यांनी प्रसंग अवधान राखून वार हातावर जिल्ह्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवारी दहावीचा इतिहासाचा विषयाचा पेपर होता ओतूर येथील चैतन्य विद्यालयातील विद्यार्थी गाडगे महाराज परिसरातील परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी वेळेत पोहोचला होता सर्व विद्यार्थी आपापल्या बाकावर बसून परीक्षेची तयारी करत असतानाच अचानक एक 17 वर्षीय अनोळखी  मुलगा वर्गात शिरला कोणालाही काही समजण्याच्या आत त्यांनी आपल्या दप्तरातून धारदार कोयता बाहेर काढला आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या दिशेने जोरदार वार केला ..अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वर्गात एकच गोंधळ उडाला मात्र ज्याच्यावर हल्ला झाला त्या सोळा वर्षीय विद्यार्थ्यांनी जराही न डगमगता कमालीचे धैर्य दाखवले. समोरून येणारा वार थेट शरीरावर होऊ नये यासाठी त्यांनी आपला हात पुढे घातला व त्याचा वार हातावर बसले आणि तो जखमी झाला मात्र प्रसंगावतावणामुळे त्याचा जीव वाचला वर्गात आरडाओरडा आणि गोंधळ सुरूवात होताच केंद्रप्रमुख संपत माने आणि इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या वर्गाच्या दिशेने धाव घेतली.

या घटनेबाबत ओतूर  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी या घटनेचे गांभीर्य दखल घेत तपास सुरू केला आहे हल्ला करणारा मुलगा देखील अल्पवयीन असून त्यांनी हे कृत्य का केले ?यामागे काही जुना वाद होता का? किंवा अन्य काही कारण आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आहेत .या घटनेमुळे तो मानसिक धक्क्यात असतानाही त्यांनी जिद्द सोडली नाही केंद्रप्रमुखांनी त्याला धीर दिला आणि नियमानुसार त्याला रायटर उपलब्ध करून देण्यात आला या मदतीच्या जोरावर त्यांनी आपल्या इतिहासाचा पेपर पूर्ण केला त्याच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments