उस्मानाबाद: जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून,ऐन हिवाळ्यात ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापत आहे. एकदाची उमेदवाराचे अर्ज दाखल होऊन छाननी झाली आणि आज दि, ७ रोजी माघार घेणार उमेदवाराचे अर्ज आणि निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले अन खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. निवडणूक चिन्ह वाटप झाल्यापासून सोशल मीडियावर गावागावात भावी सरपंचांचा प्रचार धुमधडाक्यात सुरूवात झाला आहे, त्या अगोदर पासून गाठीभेटींना जोर आला असून गुप्त समीकरणे जुळण्याच्या हालचालींना वेगही आला आहे. सध्या ग्रामीण भागातील सर्वांच्या हाती स्मार्टफोन आल्याने घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या या पारंपरिक पद्धतीचे ऐवजी आता प्रचारही स्मार्ट होऊ लागला आहे. याची प्रचिती यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूक आखाड्यात यायला सुरुवात झाली असून आपला उमेदवार व निवडणूक चिन्ह सहित प्रचार सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे, आपल्या उमेदवाराचा स्टेटस लावणे, गावातील व्हाट्सअप ग्रुप वर पॅनल प्रमुखांचा व उमेदवारांचा फोटो टाकणे तर काही मंडळी लोकगीताचा आधार घेत आहेत. 'आमचा नेता हाय ,पावरफुल ', आमचा सरपंच हिरो ला पडतोय भारी, चेहरा नवा बदल हवा अशा शेलक्या विशेषणांनी सोशल मीडियावर प्रचाराचा धुराळा उडत आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 Comments