साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी महोत्सवाचे आयोजन वर्ष अखेरीला रात्रभर साईबाबांचे मंदिर राहणार खुले-
शिर्डी: श्री साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत या निमित्ताने शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
पत्रकात कोळेकर यांनी म्हटले आहे की दरवर्षी नाताळ सुट्टी चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत या निमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व गर्दीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे या उद्देशाने मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक ३१ डिसेंबर रोजीची शेजारती व दिनांक १ जानेवारी 2025 रोजी ची पहाटेची काकड आरती होणार नाही तसेच नाताळ व नववर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे बुधवार दिनांक २५ डिसेंबर ते बुधवार दिनांक १ जानेवारी २०२५ असे सात दिवस वाहन पूजा बंद राहतील परंतु नाताळ सुट्टीच्या कालावधीत श्री साईबाबा साईसत्वव्रत पूजा अभिषेक पूजा सुरू राहील याची सर्व साई भक्तांनी नोंद घ्यावी मंदिर व परिसरातील फटाके व वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली असून सुरक्षितेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहनही श्री कोळेकर यांनी केले आहे.
हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थांचे श्री कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थांचे प्रभारी कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
0 Comments