चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालय येथे दि,२४ रोजी थोर समाजसेवक साहित्यिक कवी साने गुरुजी यांची १२५ वी जयंती विविध उपक्रमाने विद्यालयात साजरी करण्यात आली.
यामध्ये प्रारंभी या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एलके बिराजदार यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर साने गुरुजी यांच्या जीवन आधारावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ,तसेच साने गुरुजी कथामाला अंतर्गत विद्यार्थ्यांची संस्कार परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले . या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एस सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती. एल.के .बिराजदार यांनी भूषवले.
या कार्यक्रमाचे व कथामालेचे नियोजन विद्यालयातील शिक्षक श्री ठाकूर केपी यांनी केले. तसेच त्यांना सहशिक्षक श्री शिंदे एस एम, श्री शिंदे एस.बी, श्री मस्के एम ए , श्रीमती ढगे एस.बी , श्री शिंदे बी.बी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणचे कर्मचारी श्रीमती शिंदे शांभवी ,श्री सूर्यवंशी महेश यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती.ढगे मॅडम यांनी केले.
0 Comments