Hot Posts

6/recent/ticker-posts

आई-वडिलांची मुलगा सुने विरुद्ध पोटगीसाठी न्यायालयात याचिका

आई-वडिलांची मुलगा सुने विरुद्ध पोटगीसाठी न्यायालयात याचिका ;आई-वडिलांच्या बँक खात्यात दरमहा पाच हजार रुपये जमा करण्याचे आदेश


नागपूर: पालन पोषण करीत नसल्याने आई-वडिलांनी मुलगा व सुनील विरुद्ध ज्येष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अंतर्गत पोटगीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपूर्वी गैर अर्जदार यांनी आई-वडिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये न चुकता जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी की अर्जदार गंगा चरण कोरचे वय (78) व कमलाबाई कोरचे व ( ( 76 )रा. रिसाळा तहसील सावनेर जिल्हा नागपूर. यांनी मुलगा संजय कोरचे व सून स्नेहा कोरचे यांच्याविरुद्ध उपविभागीय अधिकारी सावनेर यांच्या न्यायालयात एडवोकेट रोशन वासेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली. अर्जदाराचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक या पदावर नोकरीवर आहे अर्जदार हे वयोवृद्ध असून त्यांच्याकडे आजगायत अन्न वस्त्र निवारा व वैद्यकीय देखभालीसाठी पुरेशी साधन नाही गैर अर्जदार अर्जदारांचा मुलगा या नात्याने कायदेशीर वारस आहे तथा अर्जदाराच्या मिळकतीचा उपभोग घेत आहे भविष्यातील उत्तर अधिकारी आहेत म्हणून अर्जदाराला गैरअर्जदाराकडून पोटगी मिळण्याचा हक्क व अधिकार आहे गैर अर्जदाराकडे पुरेशी उत्पन्नाचे साधन असून अर्जदाराला निर्वाह खर्च देण्याची गैर अर्जाची कायदेशीर जबाबदारी आहे अर्जदाराला गैर अर्जदाराकडून अन्न वस्त्र निवारा आणि वैद्यकीय देखभालीसाठी रक्कम देण्यात यावी याकरिता अर्जदारांनी याचिकित मागणी केली होती.

सून कधीही अर्जदारासोबत व्यवस्थित बोलली नाही नेहमी अर्जदाराची उद्धटपणे वागत असायची. गैर अर्जदाराची पत्नी भांडण करून घराच्या बाहेर काढायची सुनेने अर्जदाराच्या मुलाला आई-वडिलांपासून वेगळे होत नाही म्हणून अनेकदा भांडणे करायची तसेच अर्जदारांची सून अर्जदाराला अपमानित करायची मुलगा व सून यांच्या अशा वागणूकमुळे सध्या अर्जदारावर उपासमारीची वेळ आली आहे अर्जदारासमोर जगावे की मरावी असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण ज्या पुढच्या मुलाला काबाडकष्ट करून मोठी केली व शिकवले त्याला नोकरी लागण्याकरता विविध स्पर्धा परीक्षेची क्लासेस लावून दिले आता तोच मुलगा असून आज अर्जदाराला सांभाळत नाही. अर्जदाराकडे दुर्लक्ष केले अर्जदारांकडे उदरनिर्वाचे कोणतीही साधन नाही त्यामुळे न्यायालयाने आदेश पारित केली की अर्जदाराला दरमहा प्रतीकी महिन्याच्या दहा तारखेपूर्वी गैरअर्जदार यांनी त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 5000 रुपये न चुकता जमा करण्यात यावे दिले आहे.

Post a Comment

0 Comments