नांदेड येथील लखे कुटुंबीय मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; मुलांनीच केला आई-वडिलांचा गळा दाबून खून, नंतर स्वत: केली दोन भावंडांनी रेल्वे रुळावर आत्महत्या-
नांदेड : मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे झालेल्या लखे कुटुंबाचे आत्महत्या प्रकरणी आता बारड पोलीस ठाण्यामध्ये आई-वडिलांचे हत्याप्रकरणी दोन्ही मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिकट आर्थिक परिस्थिती मधून आलेल्या नैराश्यातून पोटच्या दोन मुलांनीच आपले आई-वडिलांचा गळा दाबून खून (Murder)केला .त्यानंतर जवळच असलेल्या मुगट रेल्वे स्थानकात रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली असे उपलब्ध पुरावे आधारे निष्पन्न झाली आहे.
मुदखेड तालुक्यातील मुगट रेल्वे स्थानक परिसरात दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी जवळा मुरार येथील उमेश रमेश लखे वय (25) आणि बजरंग रमेश लखे वय (22) या दोन तरुणाची मृतदेह आढळून आले होते. या दोघांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली तर त्यांचे वडील रमेश होनाजी लखे वय (55) आई राधाबाई रमेश लखे वय (48) यांचा मृतदेह त्यांच्याच घरा जवळा मुरार येथे आढळून आला होता .सदर घटना दिनांक 24 डिसेंबर रोजी मध्य रात्री घडली होती; परंतु दुसऱ्या दिवशी दिनांक 25 रोजी सकाळी उघडकीस येताच मुदखेड सह नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
त्यानंतर पोलिसांनी प्रथम दर्शनी पाहणी करून यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पुढील तपास करत शवाविच्छेदन अहवालानुसार आई-वडिलांचा गळा दाबून खून केल्याची बाब समोर आल्यानंतर यात दोन्ही मुलांच्या विरोधात होते खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुलांच्या आधी आई वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून या सर्व प्रकरणात कायदेशीर बाबी तपासत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
लखे कुटुंबीयांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असली तरी लखे कुटुंबीयांनी हे टोकाचे पाऊल आर्थिक विमंचनेतून उचलण्याची माहिती समोर येत आहे .एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असल्यामुळे हा घातपात आहे की आत्महत्या ?याबाबत गुढ वाढले होते अखेर या घटनेचा बारड पोलिसांनी उलगडा केला असून बिकट आर्थिक परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून पोटच्या दोन मुलांनीच आपली आई वडिलांचा गळा दाबून खून केला त्यानंतर जवळच असलेल्या मुगट रेल्वे स्थानकात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली असे उपलब्ध पुराव्या आधारे निष्पन्न झाली आहे.याप्रकरणी बारड पोलिस ठाण्यात मयत दोन्ही मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्वच दिशेने तपास करण्याचे सूचना पोलिसांना दिल्या होत्या. अखेर पोलिसांनी या घटनेचा सीताफितीने उलगडा केला आहे .गावातील मुगट रेल्वे स्थानक येथील प्रत्यक्ष दर्शनी दिलेली माहिती घरातील पुरावे वैद्यकीय अहवाल यावरून बिकट आर्थिक परिस्थितीमधून आलेल्या नैराश्यामधून उमेश रमेश लखे व बजरंग रमेश लखे या दोन मुलांनी मध्यरात्रीच्या सुमारास आई-वडिलांचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाली आहे; तर घटनेनंतर दोन्ही मुलांनी दुचाकी देऊन मुगट रेल्वे स्थानक गाठले तेथे दुचाकी लावून धावत्या रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली अशी माहिती तपासात आली आहे. यामुळे दोन्ही मयत मुलावर बारड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडिलांचे सततचे आजारपणाला लागणाऱ्या खर्चाला कंटाळून त्यांचा गळा दाबून खून केला व मयत आरोपींनीही रेल्वेखाली आत्महत्या केली वगैरे फिर्याद व्यंकटी होण्याची लकी वय 54 राहणार जवळा मोरार तालुका मुदखेड यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवाला नंतर दिलेल्या जबाबदावरून भारत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 141 / 2025 कलम 103 (1)(3) 5 भारतीय न्याय संहिता 2023 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे करत असल्याची माहिती परिसरात दिली आहे.

0 Comments