धाराशिव : “अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 4 वेगवेगळ्या गुन्ह्यातील चार नराधमास कारावास! तसेच सांगवी येथील महिलेच्या खून प्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्त मजुरी ४५ हजाराचा दंडाची शिक्षा.”-Dharashiv Distrcit Court Judgement

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : “अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 4 वेगवेगळ्या गुन्ह्यातील चार नराधमास कारावास! तसेच सांगवी येथील महिलेच्या खून प्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्त मजुरी ४५ हजाराचा दंडाची शिक्षा.”-Dharashiv Distrcit Court Judgement

 

धाराशिव : “अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 4 वेगवेगळ्या गुन्ह्यातील चार नराधमास कारावास! तसेच

सांगवी येथील महिलेच्या खून प्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्त मजुरी ४५ हजाराचा दंडाची   शिक्षा.”-

धाराशिव: तीन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चार वेगवेगळ्या गुन्ह्यातील चार जणांना तसेच खून प्रकरणी आरोपीस कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावण्यात  आली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या चार लैंगिक अत्याचार प्रकरणातील व एक खून प्रकरणातील आरोपींना धाराशिव न्यायालयाने प्रकरणातील ही शिक्षा सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येडशी ता. जि. धाराशिव येथील 1) धर्मराज मारुती कचरे, वय 50 वर्षे, यांनी गावातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याने. त्याच्येविरुध्द कलम- 376(अ)(ब) भा.दं.सं. सह 4, 6 पोक्सो सह अ.जा.ज.अ. प्र अधिनियम कलम 3(1)(आर)(एस)(डब्ल्यु अंतर्गत धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं 200/2020 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास श्री. मोतीचंद डी. राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव यांनी करुन श्रीमती मिटकरी मॅडम यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या कोर्ट केस क्र. 119 / 2020 चा निकाल दि. 11.06.2025 रोजी जाहिर झाला. यात नमूद आरोपींस भा.दं.सं. कलम- 376(AB) या कलमांच्या उल्लंघनाबद्दलआजीवन सश्रम कारावास, कलम 4, 6 पोक्सो मध्ये आजीवन सश्रम कारावास दंडाची शिक्षा सुनावली आहे.


तसेच दुसऱ्या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांजा ता. जि. धाराशिव येथील 1) हाकीम महेमुद काझी, वय 28 वर्षे, यांनी गावातील एकाअल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याने. त्याच्येविरुध्द भा.दं.सं. कलम- 363, 366(अ),376(1) सह 4, 6 पोक्सो सह अंतर्गत आनंदनगर पोलीस ठाण्यात गुरनं 127/2019 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास श्री. पोलीस उप निरीक्षक एस.जी. भुजबळ पोलीस ठाणे आनंदनगर यांनी करुन श्रीमती मिटकरी मॅडम यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या कोर्ट केस क्र. 80/2019 चा निकाल दि. 31.01.2025 रोजी जाहिर झाला. यात नमूद आरोपींस भा.दं.सं. कलम- 363  या कलमांच्या उल्लंघनाबद्दल 03 वर्षे साधा कारावास, व 3,000₹ दंड, कलम 366(अ)  या मध्ये 5 वर्षे साधा कारावास व 3,000₹  दंड, कलम 376(1) भा.दं.वि. मध्ये 10 वर्षे, सश्रम कारावास व 5,000₹ दंड, कलम 4  पोक्सो मध्ये 10 सश्रम कारावास 5,000₹ दंडा, कलम 6  पोक्सो मध्ये 10 सश्रम कारावास 5,000₹ दंडा असा एकुण 21,000₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

तसेच तिसऱ्या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेगाव ता.लोहारा जि. धाराशिव येथील 1) गोरोबा पांडुरंग वाघमारे, वय 70 वर्षे, यांनी गावातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याने. त्याच्येविरुध्द भा.दं.सं. कलम- 376(2)(L),354, 354(ब),342 सह 4, 6, 8,10, 12 पोक्सो अंतर्गत बेंबळी पोलीस ठाण्यात गुरनं 109/2013 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास श्री.महिला पोलीस उप निरीक्षक डी.व्ही. मैंदाड पिंक पथक उपविभाग धाराशिव यांनी करुन  श्रीमती मिटकरी मॅडम यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या कोर्ट केस क्र. 41/2023 चा निकाल दि.24.07.2025 रोजी जाहिर झाला. यात नमूद आरोपींस भा.दं.सं. कलम- 376(2)(J)(L) या कलमांच्या उल्लंघनाबद्दल आजीवन सश्रम कारावास, व 5,000₹ दंड, कलम 4 पोक्सो मध्ये आजीवन सश्रम कारावास 5,000₹ दंड, कलम 6 पोक्सो मध्ये आजीवन सश्रम कारावास व 5,000₹ दंड असा एकुण 15,000₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

तसेच चौथ्या गुन्ह्यातील तुळजापूर पोलीस ठाण्यातील हद्दीतील घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार: टाकळी ता. जि. धाराशिव येथील 1) सुरज बाबु लातुरे(पठाण), वय 36 वर्षे, यांनी एका गावातील एका तुरुणीवर लैंगीक अत्याचार केल्याने. त्याच्येविरुध्द भा.दं.सं. कलम- 376,376(2)(N),384, 323,504,506 अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुरनं 332/2012 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास श्री. पोलीस उप निरीक्षक एस.जी. बनसोडे उपविभाग पोलीस अधिकारी कार्यालय तुळजापूर यांनी करुन श्री.आवटे साहेब यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या कोर्ट केस क्र. 175/2022 चा निकाल दि.12.11.2025 रोजी जाहिर झाला. यात नमूद आरोपींस भा.दं.सं. कलम- 376(2)या कलमांच्या उल्लंघनाबद्दल सश्रम कारावास, व 10,000₹ दंड, कलम 323 मध्ये 06 महिने सश्रम कारावास 500 ₹ दंडा कलम 506 मध्ये 01 वर्षे सश्रम कारावास व 2,000₹ दंड असा एकुण 12,500₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

 

 

 

याचबरोबर सांगवी येथील महिलेच्या खून प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की : सांगवी ता. जि. धाराशिव येथील 1) विष्णु लक्ष्मण लोंढे, वय 31 वर्षे, यांनी  मयत- मोहिनी समाधान चोपडे, वय 32 वर्षे, रा.सांगवी ता. जि. धाराशिव यांना जिवे ठार मारल्याने त्याच्येविरुध्द भा.दं.सं. कलम- 302,452,506 अंतर्गत बेंबळी पोलीस ठाण्यात गुरनं 156/2017 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास श्री. पोलीस उप निरीक्षक एस.एल. जमदाडे पोलीस ठाणे बेंबळी यांनी करुन श्रीमती अभिश्री देव मॅडम यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या कोर्ट केस क्र. 61/2021 चा निकाल दि.12.11.2025 रोजी जाहिर झाला. यात नमूद आरोपींस भा.दं.सं. कलम- 304 भाग ii या कलमांच्या उल्लंघनाबद्दल 10 वर्षे सश्रम कारावास, व 25,000₹ दंड, कलम 452 मध्ये 05 वर्षे सश्रम कारावास 10,000 ₹ दंडा कलम 506 मध्ये 02 वर्षे सश्रम कारावास व 10,000₹ दंड असा एकुण 45,000₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.


सदरची कामगीरी  मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या आदेशावरुन श्री. मोतीचंद डी. राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशि, श्री. पोलीस उप निरीक्षक एस.जी. भुजबळ पोलीस ठाणे आनंदनगर, श्री.महिला पोलीस उप निरीक्षक डी.व्ही. मैंदाड पिंक पथक उपविभाग धाराशिव, श्री. पोलीस उप निरीक्षक एस.जी. बनसोडे उपविभाग पोलीस अधिकारी कार्यालय तुळजापूर, श्री. पोलीस उप निरीक्षक एस.एल. जमदाडे पोलीस ठाणे बेंबळी विशेष सरकारी वकील- एस.एस. सुर्यवंशी, एस.बी. देशमुख यांनी सदर केसची सरकारी पक्षा तर्फे कामकाज पाहिले. न्यायालयाच्या या न्याय निर्णयामुळे महिलांवरील व अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी कायद्याचा धाक निर्माण होईल असा विश्वास जनमानसातून व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments