मुलीचे लग्न परस्पर लावून दिल्याच्या रागातून एका महिलेस बेदम मारहाण ;सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल तुळजापूर तालुक्यातील घटना-
धाराशिव : मुलीचे लग्न परस्पर लावून दिल्याच्या रागातून एका महिलेसह पतीला सात जणांनी मिळून संगणमताने बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना तुळजापूर तालुक्यातील।कार्ला येथे घडली. ही घटना दिनांक २२ रोजी घडली याप्रकरणी फिर्यादी महिला लक्ष्मी देवकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी नामे- संजय उमराव देवकर, तेजश्री संजय देवकर, रविंद्र प्रकाश देवकर, चित्रकला रविंद्र देवकर, जितेंद्र प्रकाश देवकर, राजेंद्र जगन्नाथ देवकर, विनोद राजेंद्र देवकर सर्व रा. कार्ला ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.12.2025 रोजी 07.00 वा. सु. कार्ला येथे फिर्यादी नामे-लक्ष्मी संजय देवकर, वय 40 वर्षे, रा. कार्ला ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मुलीचे लग्न परस्पर लावून दिल्याचा राग मनात धरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,केबल व काठीने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचे पति संजय देवकर यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लक्ष्मी देवकर यांनी दि.29.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352,351(2), 189, 189(2), 191(2),190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

0 Comments